रविवार, २१ एप्रिल, २०१३


हेच ध्येय का ? (Why)

कधी किंवा बर्याचदा लेखक व्यक्तिरेखेला Want ध्येय तर देतो, पण ती त्या character ची स्वाभाविक want झाली पाहिजे. ते त्याचे खरोखर ध्येय आहे असे वाटले पाहिजे, प्रेक्षकांना ते उसन घेतलेलं आहे अस वाटू नये. आपल्याला जर कुणी सांगितलं, खूप पटवून आग्रहाने सांगितलं की तू हे काम कर ! पण जोवर ते आपणास पूर्णत: पटत नाही तो पर्यंत आपण ते करणार नाही. त्याच प्रमाणे आपण character ला दिलेले ध्येय त्याला पटलेले आहे असे वाटले पाहिजे . त्याच्या परिस्थितीला त्याच्या पूर्व अनुभवांना त्याच्या सर्व घटकांना ते संयुक्तिक झाले पाहिजे . हा भाग जरा जास्तच कठीण आहे पण एकदा का आपण आपल्या निर्मिलेल्या व्यक्तिरेखा शी संवाद करायला शिकलो कि ही गोष्ट सोपी होते.
हे सहज साध्य करण्या साठी एक प्रयोग आहे तो करावा. आपली गोष्ट नक्की झाली की ती दोन चार पानात लिहून काढावी. महत्वाच्या व्यक्तिरेखा समोर येतात. त्याच्या want हि निश्चित होतात. त्या प्रत्येक व्यक्तिरेखे चा पूरब इतिहास तयार करावा. जसे नायक समजा त्याचे वय २५  वर्षे असेल तर त्याचा मागील दहा वर्षाचा इतिहास लिहून काढावा. साधारण महत्वाच्या काय घटना ह्याच्या मागील दहा वर्षात घडल्या असतील ? तसेच त्याच्या ही मागील दहा वर्षात काय घटना घडल्या असतील ह्याच प्रमाणे जन्मा पर्यन्त चा काल्पनिक इतिहास तयार करावा. शक्य आहे हा इतिहास आपण पडद्यावर आणणार नाही आहोत. पण तरीही तो पडद्यावरील घटना नक्कीच बलवत्तर करेल. आणि त्याचे ध्येय नक्की करण्यास मदत करते  किंवा ध्येयाला बळकटी आणते.
हा असा व्यक्तिरेखेचा इतिहास तयार केला तर आपल्या व्यक्तिरेखा आपल्या पासून वेगळ्या होतात. आपल्या व्यक्तिरेखा म्हणजे जणू आपल्या प्रतिमा असायला नकोत. आपण त्याचे अनुभव जाणतो, त्याच्या ह्या इतिहासा वरून त्याचा तयार झालेला स्वभाव जाणतो. त्याच स्वरूप आपल्या डोळ्या समोर येवू लागत. हि  व्यक्ती जाड असेल कृश असेल ? कि बुटकी किंवा उंच असेल ? कसे कपडे वापरेल ? केस कसे ? मिशी कशी ? याचे मित्र कसे असतील ? सगळ्या गोष्टी हळूहळू व्यक्त ह्यायला लागतात. आणि मग कुठे काही शंका आली की ह्या अश्या वेळी हि व्यक्ती काय करेल ? तर आपण विचार करू लागलो कि ती आपल्या आतून बोलू लागते मी अमुक वेळी अशी वागले मग आता मी अशी कशी वागेल ? मला हे असच कराव लागेल आणि आपल्यालाही ते मग पटत. निर्विवाद मत तयार होत. अश्या प्रकारे आपल्या मनात व्यक्तिरेखा character च स्वरूप पक्क झाल आणि सगळे characters स्पष्ट झाले कि मग कथा हि तितकीच स्पष्ट होते. सर्व घटनांना सबळ पाठ पुरावा मिळतो. व्यक्तिरेखा ना कंगोरे मिळतात. आणी  त्या जिवंत होतात.

एप्रिल २1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा