बुधवार, २४ एप्रिल, २०१३


उपयोगी संकटे ( Benefit from Problems)
चित्रपट लेखकाला संकटांच्या इतक दुसर काहीही उपयोगी येत नाही. लेखकाला बरीच संकट अशी हाताशी ठेवावी लागतात. कारण गोष्ट मुळात संकटा शिवाय बनत नाही. आणि खुपदा व्यक्तिरेखाला character ला त्याचा स्वभाव दाखवण्या साठी, प्रेम दाखवण्या साठी, तिरस्कार दाखवण्या साठी छोट्या मोठ्या संकटांचा आधार घ्यावा लागतो. कथा सशक्त करण्यासाठी संकट खूप उपयोगी असतात. पण म्हणून नुसती संकटांची रेलचेल नको व्हायला ही काळजी घेतली पाहिजे. आपल्या  MDQ (major dramatic question) पासून आपण भरकटायला नको. व्यक्तिरेखेला त्याचे आवश्यक ते गुण अवगुण दाखवून होताच ती समस्या आटोपून मूळ प्रश्नाकडे वळता आले पाहिजे.
उदा, आपण पूर्वी नोकराचे मालकावर रागावणे आणि नोकरी सोडून जाणे दाखवले आता त्याला दुसरी नोकरी मिळाली कि नाही ? त्याच्या आर्थिक परिस्थिती चे काय झाले हे जर मूळ प्रश्नाशी निगडीत नसेल तर त्याला तिथेच सोडले पाहिजे. आपण नोकराची कथा सांगत नाही आहोत. आपण मालकाची गोची करण्यासाठी नोकराची योजना केलेली आहे. तेव्हा आपण मालका ची गोची झाली आणि त्याचे पुढे काय होते याचा विचार करणे महत्वाचे आहे. ह्या चर्चेचा उद्देश हा की कोणत्या संकटा वर आपण किती वेळ खर्च करायचा ? किती महत्व द्यायचे ह्या बद्दल जागरूकतेने काम करावयाचे आहे.
जेव्हा केव्हा आपल्याला व्यक्तिरेखे बद्दल काही महत्वाचे सांगायचे असेल तर ते सांगण्या पेक्षा ते दाखवता येईल अश्या संकटात त्या व्यक्तिरेखेला टाकावे, पण वरील MDQ विसरण्याचा धोका सांभाळून. कुठल्या संकटाचा किती आधार घ्यायचा आणि समर्पक पाने त्याला बाजूला कसा सारायचा हे काम खुबीने करता आले पाहिजे.
संकटे आणतांना ती खूप तर होत नाहीत ना ? याचा विचार ठेवावा. काहीतरी महत्वाचे सांगण्या साठी संकटे उपयोगी आहेत पण कथेमध्ये सगळ्याच गोष्टींना खूप महत्व देत येत नाही. दुसरा एक धोका असा असतो की एक लहानशी महत्वाची बाब सांगण्यासाठी आपण जे संकट आणतो आहोत ते  मूळ प्रश्ना (जो कथेचा MDQ आहे ) पेक्षा े मोठे व्हायला नको. नाहीतर आपला plot आलेख चुकेल. क्लायामक्स climax हाच सर्वोच्च बिंदू असायला हवा. कारण आपल्याला क्रमाने लहान सहान संकटांना तोंड देत मोठ्या संकटा कडे जायला आवडेल. मोठ्या संकटाला तोंड देवून मग लहान संघर्ष बघण्यात मौज वाटणार नाही.
आणि महत्वाचे तो मोठा संघर्ष नायकाला करायला मिळायला हवा असतो. आपल्या कथेचा आलेख हा नेहमी चढता असावा. अशी हि संकटाची मदत आहे जी लेखकाला संकटात ही आणू शकतो. काही संभाव्य शक्यता आपण लक्षात ठेवू
१ लहान बाबी साठी मोठे संकट आणू नये.
२ मोठ्या नाट्यपूर्ण प्रश्नाकडे दुर्लक्ष होवू देवू नये.
३ घटनांचा क्रम उताराकडे जावू नये.
४ आपण आणलेले संकट दुसऱ्या एखाद्या character ला मारक ठरू नये.
५ ते संकट सयुक्तिक असले पाहिजे. ओढून ताणून आणलेले वाटू नये.
६ संकटाचा मोह टाळावा .

एप्रिल २४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा