शनिवार, २० एप्रिल, २०१३


व्यक्तिरेखा (Characterisation)

तुमची कथा तुम्ही सांगू शकत नाही. केवळ तुम्ही ती सांगितली तर ती तितकी रंजक होणार नाही. कधी एके काळी एक राजा होता, असे म्हणताच तुम्ही ऐकणार्याच्या डोळ्या समोरून नाहीसे होता त्याच्या डोळ्या समोर तो काळ आणि तो राजा येतो मग तुम्ही जे जे काही बोलत ते राजा बोलतो कधी राणी बोलते तर कधी राजकन्या आणि अशीच कहाणी पुढे जाते. सिनेमा मध्ये तो राजा आणि तो काळ बारीक सारीक तपशिला सहित दिसतो. प्रेक्षक अवती भवती तो काळ ते ठिकाण त्या व्यक्तिरेखा सर काही तंतोतंत अनुभवतो त्या कथेचा एक अविभाज्य भाग बनून जातो. त्यामुळे आपल्या व्यक्तिरेखा character खरोखर जिवंत झाले पाहिजेत. ते जिवंत कसे होतील याचा विचार केला तर सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे विविधता ! वेगळे पण !
आपल्या भोवताली पहिले तर दिसेल किती अफाट विविधता आहे. किती झाड आहेत पण एकही दुसऱ्या सारखे नाही. आपण कथा लिहिताना मात्र ही चूक नेहमी होते कि आपले पात्र characters एकसारखे होतात. सहसा नवख्या लेखक कडून असे होण्याची शक्यता जास्त असते. सगळ्या व्यक्ती characters लेखकाच्या सारखच बोलतात. कारण लेखक त्यांना वेगळे पण देण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याच्या ते लक्षात च आलेलं नसत. पण जरा विचार केला तर हे त्यालाही पटेल. आणि मग तो ते वेगळेपण आणण्याचा प्रयन्त करेल. तर हा characters ना वेगवेगळे पण देण्याचा पर्यंत तरी कसा करावा ? अगदी सोप्प आहे. व्यवहारात पाहिलं तर प्रत्येक माणसाला काहीना काही तरी हव आहे अस दिसेल. तुमच्या घरी तुमचा जवळचा मित्र किंवा भाऊ ही आला तर काहीतरी कामानिमित्त आलेला असतो. माणसाची प्रत्येक क्रिया activity काहीतरी उद्देशाने होत असते. आपल्या कथे मध्ये प्रत्येक character ला हा उद्देश दिला तर त्याच्या मध्ये त्याच वेगळे पण जरूर दिसेल. आपल्या सर्व (साधारणत: ज्यांना संवाद आहे अश्या सर्व) व्यक्तिरेखांना characters ना उद्देश (Goal) द्यायला हवा आहे. यालाच characters want असही म्हणतात. जशी हि want उद्देश असेल त्या प्रमाणे ती व्यक्ती व्यवहार करेल. त्या उद्देशा नुसार ते character दुसऱ्या character कडे जाईल किंवा न जाईल. जाईल तर काय मागेल ? काय बोलेल हे ते character चा स्वत: आपल्याला सांगेल. म्हणजे लेखका च्या आतून ते character सुचित करेल. उदा - पुन्हा लगान, भुवन गोळी कडे जातो त्याला आपल्या टीम मध्ये सामील करण्या च्या उद्देशाने ह्या ठिकाणी भुवन चे ध्येय ठरलेले आहे. पण गोळी चे हि काहीतरी ध्येय असणारच, ते आहे कि त्याला आपली जमीन प्रिय आहे, तिचे रक्षण त्याला करायचे आहे. आणि भुवन हे ओळखून आहे. म्हणून तो त्याला मार्मिक टोमणा मारतो की “ तू काय बाबा एक शेताचा तुकडा विकून लगान भरून टाकशील !” गोळी च्या ध्येयाला ठेच लागते, तो कळवळतो, आणि दुसरा काही मार्ग दिसत नाही तेव्हा भुवनला साथ द्यायला तयार होतो. आता ह्या ठिकाणी विविधतेचा नमुना दिसतो, भुवन ची आणि गोळी ची want ध्येय एक सारखे आहे का ? आहे ……. पण नाही ! कारण त्याच्या मध्ये मुलभुत फरक आहे. भुवन कडे दूरदृष्टी आहे. धैर्य आहे. त्याने सर्व गावकर्यांच्या विरोधात इग्रजांच्या अधिकार्याशी ह्या लढाई ची निवड केली आहे. पण गोलीला फक्त आपले स्वत:चे शेत जमीन वाचवायची आहे. अश्या प्रत्येक खेळाडू मध्ये वेगळे पण दिसते. भुरा हा स्तुतीने भाळून टीम मध्ये येतो, इस्माईल च्या येण्याच कारण आणखी वेगळ आहे, की इंग्रज बाई भुवनला मदत करते आहे आणि आपण गाववाले असून हि वेगळे का ? ह्या प्रश्नाने भंडावून तो येतो. तर लाखा फितूर खेळाडू  बनून येतो. टीम बनते ११ खेळाडू येतात पण प्रत्येकाच्या want ध्येयामध्ये फरक आहे, विविधता आहे. त्यामुळे ते सगळे जिवंत वाटतात. त्याच्या मुळे कथा जिवंत होते. आणि प्रेक्षक भारावून बघतात ……………….  पुन्हा पुन्हा !

एप्रिल २0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा