मंगळवार, २३ एप्रिल, २०१३


व्यक्तिरेखा चे आपापसातील संबंध ( Interrelations of characters )

एका कथे मधल्या सर्व व्यक्तिरेखा चा एकमेकाशी काहीनाकाही संबंध असतो च. मैत्रीचा असेल रक्ताच्या नात्याचा असेल, दुष्मनी असेल ! अनोळखी असणे हा देखील संबंध असतो. मग त्यांना एकमेका बद्दल काय वाटते ? हे कथे च्या दृष्टीने खूप खूप महत्वाचे असते. एक दोन character असे असतील कि जे संपूर्ण कथेमध्ये एकदाही भेटत नाहीत. पण सहसा सर्वांचा एकमेकांशी उल्लेख करण्या इतका तरी संबंध जरूर येतो. त्यांना एकमेका बद्दल काय वाटते हे सांगत बसलो तर कथा खूप लांब होणार. त्यात शॉर्ट कट कसे वापरायचे ते नंतर पाहू. पण सर्व characters चे एकमेका बद्दल चे मत विचार लेखकाच्या माइंड मध्ये स्पष्ट clear असायला हवेत. ज्या वेळी तुम्ही संवाद लिहाल त्यावेळी जागा सापडते तिथे ते त्या पद्धतीने व्यक्त करू शकता. त्याच्या त्या छोट्याश्या उल्लेखाने त्याच्या स्वभावाला उठाव मिळू शकतो, अश्या बारीक सारीक हालचाली आणि वक्तव्यांनी words character ला जिवंत पणा येतो. कथेला बळ मिळते. ती अधिक स्पष्ट प्रभावी होते.
आपल्या दोन्ही हातांच एकमेकाशी जे coordination असत तसाच हे आहे.
विशेषत: वैचारिक मतभेद किंवा साहचर्य दाखवणे जर जास्तच कठीण असते. जे जे काही वैचारिक आहे ते सांगणे सोपे असते पण दाखवणे खूप कठीण असते. एखाद्या character  ला कुणाचा राग आला तर तो सांगणार नाही की मला राग येतो आहे. तर तो काहीतरी वस्तू फेकून देईल. नजरेने तसे दर्शवून देईल. म्हणजे काय तर त्याला कृती द्यावी लागेल तरच  त्याची ती अभिव्यक्ती प्रभावी ठरेल. अन्यथा आपण फक्त बोलून सांगितले कि त्याला राग येतो आहे तर ते परिणाम करणार नाही.
समजा हिरोला प्रेयसीची आठवण येते आहे. गाणे टाकावे हा अतिशय सोपा प्रकार आहे पण तितका वेळ नसेल तर काय करणार ? तो स्वत:ची बोलतो कि मला तुझी आठवण येते आहे ! किंवा तो तिचा फोटो पहात बसेल ! खिडकीतून आकाशातला चंद्र बघेल ! हातात फोन घेवून तिला फोन करू का ? तिचा नंम्बर काढेल ! इ. कृती दाखवली तरच तो प्रभावी ठरेल. सिनेमा हे दाखवण्याचे मध्यम आहे. आणि आपसातील संबंध विचार दाखवण्या तून ह्या छोट्या गोष्टीनी  सिनेमा  मोठा होतो.

एप्रिल २३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा