व्यक्तिरेखा आणि कथा (Character and Story)
आपल्या व्यक्तिरेखा characters आपली गोष्ट सांगतात. आपण त्याच्या तोंडून बोलतो जणू आपण बोलतच नाही, आपण त्यांना बोलायला लावतो. जणू हि त्यांचीच गोष्ट आहे. आपण त्यांना जीवंत करतो, काही काळापुरत का असेना त्या अर्थाने ती गोष्ट आपली न रहाता त्यांची होते. अगदी तसेच जसे ईश्वराने ( किंवा ज्या नैसर्गिक निर्मिती करणाऱ्या शक्तीला आपण मानतो ती) आपणाला जन्म दिला, हे शरीर दिल, मन दिलं, आपण जिवंत आहोत पण स्वतंत्र आहोत. आपण काय कराव हे आपण ठरवतो. आपण काय बोलाव ते आपण बोलतो. ती शक्ती (ईश्वर) आपल्याला बळजबरी करीत नाही कि आपण काय बोलावे ? कसे वागावे ? इ. आपण गाणे ही गावू शकतो किंवा शिव्याही देवू शकतो. पुण्य करण्या इतकीच आपल्याला पाप करण्याची ही मोकळीक आहे. आपण तसे करू नये हे तितकेच खरे !
मुद्दा असा कि आपल्या characters ना आपण तशी मोकळीक दिली तरच ते जिवंत वाटतील आणि महत्वाचे म्हणजे त्यांनी आपली गोष्ट स्वत:ची गोष्ट सांगतो आहोत तशी सांगितली पाहिजे. त्याची गोष्ट वेगळी आणि आपण सांगत आहोत वेगळ तर गडबड होईल. प्रत्येक character आपली ठरलेली गोष्ट सांगणार असायला हव असत. त्याचा तेवढा भाग त्याने इमाने इतबारे सांगावी. म्हणजे लेखकाने त्याला तितकच स्वातंत्र द्याव, आणि अस द्याव कि जणू तो पूर्ण स्वतंत्र आहे. कदाचित तो एका सीन साठी येणार असेल पण त्याचा कार्यभाग त्याच्या दृष्टीने परिपूर्ण असावा. मग एका सीन मध्ये येणारा नोकरही मालकाला झापतो आणि लक्षात राहून जातो.
व्यक्तिरेखा आपली गोष्ट पुढे नेणारी असली तरच ती व्यक्तिरेखा जिवंत वाटते, लक्षात रहाते. आणि विशेष म्हणजे आपली गोष्ट यशस्वी होते. गोष्ट म्हणजे सिनेमा चा आत्मा आहे. बाकी सारे काही शरीर किंवा कपडे अलंकार इ. शरीर आकर्षक तेजस्वी तितका आत्मा सुंदर असणारच म्हणून शरीराला सुंदर करण्याचा शक्य तितका प्रयन्त करावाच पण आत्मा निस्तेज असेल तर शरीरला कितीही कपडे अलंकार घातले तरी काहीही उपयोग होणार नाही. सगळा प्रयन्त आत्मा तेजस्वी करण्यासाठी करावयाचा आहे. त्यात व्यक्तिरेखा सर्वात महत्वाचा भाग आहेत. म्हणजे समजा की व्यक्तिरेखा characters हे शरीर आहेत. हात पाय आहेत. ते मूळ शरीराचे च असावेत. कुणाचे हात कुणाचे पाय असा प्रकार जितका विचित्र असेल तितकेच character चे सुद्धा कथेशी आहे.
story सर्वार्थाने त्या characters ची झाली पाहिजे !!
एप्रिल २२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा