अव्दितीय (Uniqueness )
"The structural unity of the parts is such that, if any one of them is displaced or removed, the whole will be disjointed and disturbed. For a thing whose presence or absence makes no visible difference is not an organic part of the whole." - Aristotle
कोणत्याही निसर्ग निर्मित वस्तू मधील एखादा भाग जर काढून टाकला किंवा जागा बदलून दुसरी कडे लावण्याचा प्रयन्त केला तर काय होईल ? समजा आपल्या शरीरा वरील हात काढून पायाच्या जागी लावला कान डोळ्याच्या जागी बसवण्याचा प्रयन्त केला तर सगळी गडबड होवून जाईल. वरील अरीस्टोटल चे विधान हेच सांगण्या चा प्रयन्त करते. अव्दितीय एकजूट (unity) अशी असते कि त्यातून जर त्याचा एखादा भाग काढून टाकला किंवा त्याची जागा बदलली तर त्याच्या संपूर्ण अस्तित्वा मधेच गडबड होते. या विरुद्ध असेही म्हणता येईल की ज्या एका भागाच्या काढून टाकण्य मुळे किंवा एका भागाची जागा बदलण्या मुळे त्याच्या संपूर्ण अस्तित्वात काहीही फरक पडत नसेल तर तो भाग अद्वितीय भाग नाही . तो भाग तितका महत्वाचा नाही. निसंकोच पाने तो ताबडतोब काढून टाकावा.
एक उत्कृष्ट स्क्रीन प्ले चे ही तसेच आहे. एखादा सीन काढून टाकला तरीही त्या कथेच्या परिणामात काहीच फरक पडत नसेल तर तो सीन कुचकामी आहे तो तात्काळ काढून टाकावा. एखाद्या सीन ची जागा बदलली तरी त्याचा परिणाम बदलेल आणि जर बदलत नसेल तर तो सीन काहीही कामाचा नाही. सिनेमा ची कथा पुढे न नेणारे एखादे वाक्य सुद्धा लेखकाने खपवून घेवू नये. तरच तो सीन अद्वितीय बनू शकेल आणि अश्या अद्वितीय Unique सीन्स नि मिळून उत्कृष्ट स्क्रीन प्ले बनू शकेल.
हा Uniqueness सीन मध्ये आपल्या सिनेमा मध्ये आणणे खूप कठीण असते. Unique म्हणजे एकमेव अद्वितीय म्हणजे त्याच्या सारखा तोच, त्याच्या सारखा दुसरा नाही. अनेक गोष्टींचा पाठ पुरावा करता करता कुठेतरी एक दोन गोष्टी अश्या सापडतात ज्या एकमेव असतात. अश्या गोष्टी सुचणे हि देखील आपल्या हातातली गोष्ट नाही. हुकमी रीतीने असे काही लिहिता येत नाही. ते खूप विरळ कधी तरी योगायोगाने सुचते. ती ईश्वरी कृपा असते, कधी तरी आपल्या डोक्यात लकाकते आणि लेखकाला धन्य करून जाते. आपण पाठ पुरावा करीत राहणे एवढेच आपल्या हाती असते.
पुढील भाग पासून आपण characterisation व्यक्तीरेखा कशी परिपूर्ण घडवावी ह्या विषयी च्या अभ्यासाला सुरुवात करू. माझ्या ह्या लिखाणा चा कोण कोण उपयोग करीत आहे ? जे जाणून घेण्याची इच्छा आहे. कृपया वाचकांनी मला माझ्या ई-मेल आयडी वर मेल करावेत आणि आपली ओळख वाढवावी हि विनंती.
एप्रिल 19
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा