मंगळवार, १६ एप्रिल, २०१३


आपला सीन आपण लिहावा आणि खालील प्रश्न स्वत:ला विचारून पहावेत, ह्या प्रश्नाच्या उत्तरात आपल्या लिहिलेल्या सीन चा दर्जा आपणास कळतो,  

१) ह्या सीन ची गरज किती आहे ? (purpose of the Scene )

    आपला लिहिलेला सीन वाचतांना विचार करावा की ह्या सीन मुळे काय माहिती प्रेक्षकांना मिळणार आहे ? कोणत्याही सीन मधून फक्त दोन प्रकारची माहिती देता येवू शकते. एक कथा पुढे सरकते किंवा  एखाद्या व्यक्तिरेखे बद्दल अधिक माहिती पुरवते. ह्या व्यतिरिक्त काहीही जर सीन मध्ये माहिती content असेल तर ती उत्कृष्ट स्क्रीन प्ले ला घातक आहे असे समजावे.

ह्या सीन मधून आपली किती आणि कशी पुढे सरकणार आहे ?
उदा - लगान सुरुवातीला येणाऱ्या प्रत्येक सीन मधून एकेक गोष्ट कळत  जाते की दुष्काळ पडलेला आहे …… दुगुनी लगान द्यावी लागणार आहे. इग्रज ऐकणार नाहीत अश्या प्रकारे परिस्थितीचे गांभीर्य seriousness वाढत जाते. हळूहळू एकेका सीन मधून आपण MDQ मोठ्या महत्वाच्या प्रश्ना कडे जातो. कधी कथेला वळण देणारा सीन येतो कधी उंची देणारा सीन येतो. ज्या सीन मध्ये कथा पुढे सरकत नाही तीच तीच माहिती एका character दुसऱ्याला आणि दुसरा तिसऱ्याला सांगत असेल तर कथा तिथेच थांबलेली असते. प्रेक्षक खोळंबतो आणि कथेची पकड ढिली होते. कथा वेगवेगळ्या प्रकारे पुढे सरकवता येते. पहिल ध्येय हे असाव कि आपल्याला प्रेक्षकाना MDQ कडे न्यायचं आहे. एक एक पायरी ने आपल्याला महत्वाच्या मोठ्या प्रश्नाची ओळख करून द्यायची आहे. आपले सीन एका मागे एक असे यावेत कि हे ध्येय साध्य व्हायला हवे. कुठल्याही यशस्वी चित्रपटात हेच आढळून येईल. पण प्रत्येक फिल्म मेकर हे आपल्या वेगळ्या स्टाइल ने करीत असतो. कधी तो MDQ आधी सांगतो आणि मग स्पष्टीकरण देत जातो की हा सगळा काय प्रकार आहे. तर कधी तो हळू हळू MDQ कडे पायरी पायरीने नेतो. किंवा आणखी काही प्रयोग करतो.

दुसरी गोष्ट सीन मधून कळते ती व्यक्तिरेखे बद्दल ची माहिती. आपण character बद्दल काय माहिती देतो आहोत ? ती कहाणी शी किती संबंधित आहे ? आता लगान मधलाच एक सीन आहे वर वर पाहता तो तितकासा महत्वाचा वाटत नाही. भुवन ची एन्ट्री ……… रसेल हरिणांची शिकार करतो आहे आणि भुवन हरणांना सावध करतो. ह्या ठिकाणी भुवन ची भूतदया (sympathy for nature and animals) दिसते. तसेच तो पुढे काहीतरी क्रांती करणार आहे त्याची बंडखोरी सुद्धा दिसून येते. जी पुढे कथेमध्ये महत्वाची भूमिका असणार आहे. अश्या प्रकारची चुणूक दाखवली तर सीन सार्थकी लागतो. पद्धती वेगवेगळ्या अनेक असू शकतील. पण परिणाम कारकता effectiveness टिकवला पाहिजे. सिनेमाच्या सुरुवातीला व्यक्तिरेखांची characters ची माहिती जास्त प्रमाणात द्यावी लागते. कधी कधी character खूप जास्त असतील तर निवेदन narration वापरून वेळ वाचवला जातो. काही वेळा आपली व्यक्तिरेखा काही काळानंतर आपले वेगळे रूप दाखवणार असते तशी कथेची गरज असू शकते. त्या वेळी योग्य ती खुबी वापरून आपले सीन लिहायला हवेत. म्हणजे जी माहिती आता सांगायची नाही ती सांगणारे सीन किंवा त्यातला काही भाग वगळावा.

april 17

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा