गुरुवार, २५ एप्रिल, २०१३


व्यक्तिरेखांचे प्रकार (Types of Character)


खर म्हणजे व्यक्तिरेखांचे प्रकार म्हणण चुकीच आहे. पण ते फक्त आपल्या भाषेच्या सोयीसाठी आपण वापरू यात. म्हणजे निर्देश करण्यासाठी खालील प्रमाणे व्यक्तिरेखांचे प्रकार पाडता येतील.

१ नायक -

यात आपण नायिकेचा ही अंतर्भाव करू . काही वेळा नायक दोन तीन किंवा चार हि असतात. त्यांच्या प्रत्येकाच्या नायिकाही असतात. पण कथेमध्ये चार नायकांना लेखक न्याय देवू शकत नाही. तुम्ही असे सिनेमे पाहिलेत तर सहज लक्षात येईल कि चार नायक असले तरी एक मुख्य नायक असतो. जो सर्वात जास्त आकषर्ण केंद्र ठरतो. बाकीचे त्याला मदत करणारे ठरतात. त्याच्या भूमिका त्या मानाने कमी कार्यशील active असतात. नायक म्हणजे ज्याच्या सोबत कथा चालते, प्रेक्षक ज्याच्या संगतीने कथा अनुभवतात. ज्याला काहीतरी ध्येय असते, त्या ध्येयासाठी तो धडपडत असतो. त्याची ही धडपड पाहण्या सारखी असते. आणि तीच खरी कथा असते. ह्या नायकाच्या ध्येय वरून लेखकाचे लक्ष ढळू नये. सदोदित हे ध्यानात असावे की सर्व बाकीचे characters नायकाची ही धडपड दाखवण्या साठी आहेत. त्यांना आपण सहाय्यक व्यक्तिरेखा म्हणू , या सर्वांना त्यांचे स्वत:चे आयुष्य आहे, त्याचे स्वत:चे ध्येय ही आहे, पण ही कथा त्यांची नाही. नायकाच्या कथेला (म्हणजेच आपल्या मूळ कथेला) बळ देण्यासाठी, नायकाच्या कथेचा भाग म्हणून ह्या व्यक्तिरेखा आलेल्या असतात. त्यांचा तितकाच सहभाग व्हायला हवा असतो. एखादा नायिका प्रधान सिनेमा पहिला तर कळेल, काय होत ? सासू नणंद सुनेला छळतात म्हणजे सुनेच्या व्यक्तिरेखेला उठाव आणतात, सुनेच्या बद्दल प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती sympathy निर्माण करतात. मग एखादा दीर (नवऱ्याचा लहान भाऊ)  तिला काहीतरी मदत करतो, कशी मदत करतो हे दाखवता दाखवता आपण दिराचीच कथा सांगू लागलो तर मोठा गोंधळ होईल. सुनेची कथा शेवटा पर्यंत सुने सोबत पोहोचली पाहिजे. सुनेवर झालेल्या अन्यायाचा यथार्थ बदला घेतला गेला पाहिजे किंवा जो काही शेवट लेखकाला भावतो तो झाला पाहिजे.
तसा खलनायक ही सहाय्यक च असतो असे म्हटले पाहिजे कारण तो सुद्धा विरोधातून नायकाचे व्यक्तिमत्व उठावदार करीत असतो.
हे सगळ करतांना नायकाला इतका जास्त वाव दिला जावू नये की तो वास्तविक (natural) वाटणार नाही. म्हणजे उदा - नायकाची आई नायका वर अतिशय प्रेम करते. सकाळी ती त्याच्या साठी नाश्ता करून देते. तेव्हा ती त्याच्या हातात नाश्त्याची प्लेट देते त्याचे पाठीवरून हात फिरवते. “घे रा बाळा नाश्ता, कर नीट चावून खा इ. बोलते तो खातो आहे तो पर्यंत त्याच्या जवळ बसते. असे दाखवले तर ते नाटकी वाटेल. पण या उलट तिन  नाश्त्याची डिश ठेवून निघून जात  “लग्न कर पटकन आणि माझी ह्या व्यापातून सुटका कर !आता खूप केल तुमच, मलाही रिटायर होवू दे !” तर ते जास्त natural वास्तविक वाटेल. सर्व characters नायाकाचीच वरवर करत राहिले तर ते कंटाळवाण ही वाटेल.
तर सांगण्याचा मुद्दा काय तर नायकाला सोडायचं नाही आणि अति धरूनही ठेवायचं नाही. त्या प्रमाणे सहाय्यक व्याक्तीरेखाचा ही तोल सांभाळायचा !
एप्रिल २५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा