बुधवार, १७ एप्रिल, २०१३


कथेशी सीनचा संबंध (Relation to the Story)

  केवळ अमुक एका सिनेमात गाजलेला म्हणून  किंवा माझ्या सुपर स्टार ला आवडतो म्हणून  तश्या प्रकारचा तसा वाटणारा सीन टाकणे सृजनशील Creative लेखकाला कधीच रुचणार नाही. तो त्या सीन वरून आणखीन पुढचा विचार मांडून काहीतरी आगळा वेगळा सीन तयार करण्याचा Develop प्रयन्त करेल आणि प्रयन्त करेल तर यशस्वी देखील होईल. आणि तो त्याही पेक्षा जास्त प्रशंसा मिळवून जाईल. खरे पाहता शोर्ट कट हा फार नुकसान करणारा मार्ग आहे. तुमच्या प्रतिभा शक्तीचा अवमान तर हा करतोच पण तिला तो हळू हळू निकामी देखील करू शकतो. म्हणून कधी ही असे डुप्लिकेशन चे काम करू नये. थांबा वाट पहा ……… खूप वेळ वाट पहावी लागली तरी वाट पहा. काहीतरी नवीन सुचेल. पण जर तुम्ही तडजोड compramise केले कि मग तुमची प्रतिभा गप्प बसेल. पण जर तुम्ही अडून बसलात कि नाही हे होवून गेलेले आहे मला काहीतरी नवीन हवे आहे जे माझ्या कथेशी प्रामाणिक आहे.
तेच मला सांगितले पाहिजे. मला माझ्या कथेसाठी काम करायचे आहे. माझ्या कथेला पुढे नेणारा, कथेला परिणाम कारक करणारा सीन मला टाकला पाहिजे अन्यथा तो सीन लिहू नये किंवा वगळून टाकावा. पुन्हा पुन्हा वाचून सीनचा कथेशी संबंध दृढ आहे  की नाही तपासून पाहावे. हा सीन नसला तर काय होईल ? कोणते माहिती प्रेक्षकांना मिळणार नाही आणि त्याचा कहाणी समजण्यात काय समस्या येवू शकेल याचा तपशील पाहून त्या सीन ची योग्यता ठरवावी.


स्थळ (Location)


हा सीन कोणत्या ठिकाणी Location घडावा ? कोण कोणत्या ठिकाणी हा सीन घडू शकतो ? संभाव्य ठिकाणांची यादी करावी. प्रत्येक ठिकाणी तो कसा घडेल याची मनोमन उजळणी करावी. कुठे घडला तर तो जास्त परिणाम कारक वाटतो. तुम्हाला तो कुठे घडलेला भावतो ……. नोंद करावी. शंका वाटत असल्यास एखाद्या मित्राला मैत्रिणीला विचारावे की असे असे तुला करायचे असल्यास तू कुठे जाशील ? जसे प्रेमभंगाचा सीन असेल उंच बिल्डींग च्या टेरेस वर कि समुद्र किनारी  कि रेल्वे प्लट फार्म ? शोध घेणे महत्वाचे असते. बर्याचदा आपण आपणाला भावणारा निर्णय आपण पटकन घेतो. पण एक सदोदित लक्षात असू द्यावे सिनेमा हा आपल्या साठी नाही ………… कधीच नाही. तिथे आपल्या व्ययक्तिक आवडी निवडीला किंचितही जागा नाही आणि ती नसावी. Third Eye नेहमी वापरला पाहिजे. कि हे कसे दिसेल ? प्रेक्षकांना कसे दिसेल ? आवडेल कि नाही ? त्यांना ह्यात वेगलपणा दिसला पाहिजे आणि तो भावला पाहिजे. आणि location मधला वेगळे पणा शोधण तितकस कठीण नसत. भरपूर वेगवेगळी locations उपलब्ध असतात.


काळ (Time)

हा सीन कधी घडला पाहिजे काहीवेळा पेक्षा बर्याच वेळा काळ म्हणजे सकाळ कि सायंकाळ, दिवसा की रात्री ह्याची उत्तर सोपी असतात. जस ऑफिसला जाणार म्हणजे दिवसाच असेल पण काहीवेळा अशी परिस्थिती निर्माण करता येवू शकते कि तो रात्री ऑफि मध्ये आहे. ह्या रात्रीच्या वेळी ऑफिस मध्ये असण्याने वेगळे नाट्य गवसते. का हा रात्री ऑफिस मध्ये आला असावा ? काहीतरी गफला करणार असेल ? काहीतरी झालेला गफला कसा झाला हे शोधत असेल ? अश्या प्रकारे बऱ्याच प्रकारचा वेगळे पणा  शकतो आणि आपल्या कथे मध्ये नाट्य पूर्ण प्रसंग आणता येतात. तसेच काहीवेळा हा सीन रात्री चा का किंवा दिवसच का इ. गोष्टींचा तपशील द्यावा लागतो आवश्यकता असेल तसा तो द्यावा. काळ आपल्या सीन मधील दृश्यात वेगळा रंग भरू शकत कारण काळा  नुरूप वेळेनुसार प्रकाश योजना बदलते आणि प्रकाश सिंचे स्वरूप आमुलाग्र बदलू शकतो.


april 17



सीन आणि व्यक्तिरेखा (Scene and Character)

आपल्या सीन मध्ये व्यक्तिरेखा कशी दाखवली गेली आहे ? ती तशी दाखवणे  योग्य आहे का ? काही प्रश्न विचारात घ्यावेत -------- विनिमय करावा. आपल्या character मूळ स्वभाव तसाच आहे की तो कुठे बदलला गेला आहे. जसे कि तो आई वर प्रेम करतो पण ह्या सीनमध्ये तो आई शी भांडतो ! का भांडतो ? त्या भांडणाचे कारण प्रेम असेल तरी चालेल किंवा त्या भांडणा मुळे प्रेमात वाढ होणार असेल ? किंवा आई मुला मध्ये दुरावा निर्माण करणे हि कथेची गरज असेल ? किंवा आणखीन काहीही योग्य कारण असेल ! पण ते कथेला पोषक नसेल तर तो सीन बदलणे आवश्यक होईल.
सीन व्यक्तिरेखा character ची ओळख करून देतो तेव्हा ती ओळख योग्य प्रकारे झाली आहे का ? महत्वाच्या character ची ओळख लक्षणीय व्हायला हवी असते. तसेच इतर characters ची ओळख लक्षात राहील अशी झाली पाहिजे.

एखादा सीन एखाद्या खूप लहान व्यक्तिरेखेचा होवून जातो तर तो खरोखर त्याचा होतो आहे का ? मागे नोकर आणि मालक असे उदाहरण दिलेले आहे. त्यावेळी त्या नोकराला न्याय दिला गेला पाहिजे. कारण नोकर पुन्हा स्क्रीन वर येणार नाही पण त्याच्या ह्या सीन मुळे मालकाच्या पुढील सीनचा परिणाम वाढणार आहे. अश्या प्रकारे सर्व सीन मिळून सिनेमा यशस्वी करणार असतात. त्या त्या सीन मध्ये त्या त्या व्यक्तिरेखांना न्याय मिळायला हवा असतो.
सीन च्या सुरुवातीला character मानसिक दृष्ट्या कुठे आहे. आणि सीन च्या शेवटी तो कुठे पोहोचला हा प्रवास योग्य आहे कि नाही ? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे याचे उत्तर लेखक कडे असायला हवे. character चे संवाद dialogue समर्पक आहेत की नाही याची पडताळणी केली पाहिजे. शूटिंग च्या वेळी बरेच dialogue बदलतात पण ते तसेच्या तसे बोलले गेले पाहिजेत. सगळ्या व्यक्तिरेखा एकसारख्या वाटायला नकोत. त्याच्यात सौम्य तरी मतभेद असायला हवेत. दोन लोकांच देखील कधी सर्व बाबतीत एकमत आढळत नाही हे लक्षात ठेवाव.
प्रत्येक character च आपल स्वत:च ध्येय असत ते ह्या सीन मध्ये जपल गेल आहे का ?
MDQ चा संघर्ष वाढता आहे की नाही ?
नकारात्मक भूमिका संघर्ष वाढवत आहेत कि नाही ?
ह्या सीन ची सुरुवात मागील सीन च्या शेवताशी सुसंगत  आहे की नाही ?
ह्या सीन चा शेवट पुढील सीन च्या सुरुवातीशी जुळेल कि नाही ?
सीन मध्ये दृश्य visual भाग अपेक्षित परिणाम आणेल का ?
त्यातले आवाज sound कसे असतील ? ते परिणाम साधतील का ?
सीन मध्ये characters काही कृती  business द्यावी का जी सीन मधल्या content ला पूरक effective असेल.
मागील सीन आणि ह्या सीन मध्ये कथेचा किती काळ गेला आहे ? सहसा flash-back scene दाखवतांना हे जास्त महत्वाचे असते. तो कश्या प्रकारे लक्षात आणून दिला जातो आहे ?
ह्या सीन चा मूड serious comedy anger etc व्यवस्थित व्यक्त होतो आहे का ? हा मूड भाव सर्वात जास्त महत्वाचा कारण हा मूड प्रेक्षका मध्ये येणे आणि शेवटा पर्यंत टिकून रहाणे हेच चित्रपटाचे यश असते.


एप्रिल 18


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा