एप्रिल २६
कमजोरी - strong point सोबतच weak points सुद्धा नायकाला अभिव्यक्त establish व्हायला मदत करतात. काही वेळेला तो अन्याय सहन करतो का करतो तर त्याची आई खलनायकाच्या तावडीत असते. आई हि त्याची कमजोरी असते तरीही त्याच्या character ला बळ देते. आई साठी तो मार खातो तरीही प्रेक्षकांची सहानुभूती मिळवतो. कधी नायक भित्रा सुद्धा असू शकतो, त्याचा भित्रेपणा त्याच्यातल्या माणसाला जास्त जिवंत करतो. आणि मग तो त्याच्या स्वत:च्या आतील भीतीवर विजय मिळवतो. आणि अचानक मोठा संघर्ष बघायला देतो तेव्हा सुखद आश्चर्य युक्त धक्का देतो. नायकच्या आतील कमजोरी त्याच्या हव्या असलेल्या धेय्याला मिळवण्याचा प्रवास कठीण करतो त्यामुळे अनिश्चितता वाढवते आणि त्यामुळे कथेमध्ये रंगत येते. नायकाच्या स्वभावात असलेल्या कमजोरी मुळे कधी तो अचानक संकटात अडकतो. प्रेक्षकांना हाही धक्का कथेशी एकरूप करू शकतो. कल्पक लेखक नायकाच्या एखाद्या कमजोरी चच शेवटी भांडवल करून खूप गोड आश्चर्य युक्त धक्का देवून मोठ्या संकटातून त्याला वाचवतो. नायका साठी वेगवेगळ्या शक्ती आता पर्यंत खूप वापरून झाल्या आहेत. आता वेळ आहे नायकाच्या एखाद्या कमजोरितुन तो कसा उभा राहतो. आणि संघर्ष करतो आणि त्याला हवी असलेली गोष्ट त्याचे ध्येय मिळवतो. आपण निवडलेली लगान काय आहे ? तेच भुवन हा क्रिकेटच्या बाबतीत कमजोर व्यक्ती आहे आणि तो त्या साठी स्वत:ला पूर्ण योग्य बनवतो, एक सशक्त टीम बनवतो आणि जिंकतो. आपल्या कमजोरी वर खुबीने मात करणे आणि युक्तीने त्या बाबतीत बलवान असलेल्या वर विजय मिळवणे खूप सुखावणारे असते.
अंर्त:मन (Subconscious Mind) - सिनेमा पहाणे हा एक भावनिक अनुभव असतो. कुणीही सिनेमा काहीतरी ज्ञान मिळवण्या साठी बघत नाही. काहीही शिकण्या साठी सिनेमा बघायला जात नाही. माणूस सिनेमा पाहतो तो त्याच्या मानसिक अवस्थेला सुखावण्या साठी. स्वत:ला विसरण्या साठी. त्या दोन तासात त्याला जर त्याच्या काही विवंचना ची आठवण झाली तर आपण फेल झालो असे समजावे. पण जर का त्या दोन तासात त्याला त्याच्या व्यावसाईक घरगुती समस्यांची आठवणही झाली नाही. तो पूर्णत: कथेमध्ये स्वत:ला विसरला आणि ज्यावेळी पडदा सफेद झाला त्यावेळी एका अदभुत अनुभवातून बाहेर आला. त्याला स्वत:ला सावरावे लागले तर आपण फिल्म मेकर म्हणून जिंकलो असे समजावे. मग हा असा अनुभव त्याला पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो आणि तो पुन्हा पुन्हा तो सिनेमा पाहतो. त्याच्या मित्र परिवारात आवर्जून तो सिनेमा बघण्यासाठी प्रवृत्त करतो. आणि तुमचा सिनेमा सुपर हिट होवू शकतो.
पण हे करण्यासाठी तुम्ही त्याला भावनिक करण्या शिवाय दुसरा मार्ग नाही. आणि हा भावनिक अनुभव देण्यासाठी तितक संवेदना शील मन आपल्या अभिनेत्याच असायला हव. महत्वाच हे की तुमच्या कथेमधील व्यक्तिरेखा देखील तितक्या संवेदनशील असायला हव्यात. फक्त नायक नाही तर सर्व व्यक्तिरेखा मनाला भिडणाऱ्या असायला हव्यात. अगदी खलनायक सुद्धा ! पण कथा सर्वात जास्त नायकाची असते म्हणून हा गुण नायक कडे परिपूर्ण स्वरुपात असावा. त्याच्या प्रत्येक कृती तून त्याच्या प्रत्येक वाक्यातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला गेला पाहिजे. आणि ती क्षमता लेखकांनी निर्माण करून ठेवलेली पाहिजे. आपल्या चिंतनातून विचार प्रक्रियेतून ह्या व्यक्तिरेखा घडवल्या गेल्या तर त्या परिपूर्ण होतात. आपल्या सभोवताली आपण पाहतो ऐकतो त्यातून काही बाही बारीक सारीक लकबी, घटना, आपल्या नायकाच्या वागण्या मध्ये जणू त्या त्याच्याच आहेत अश्या पद्धतीने आणाव्या लागतात. आपल्या नायकाचे अंर्त:मन संवेदनशील आणि अनुभव संपन्न करण्यासाठी सखोल अभ्यासाची आवश्यकता असते. हा बराच मानसशास्राचा भाग आहे . अश्या स्वभावाचा माणूस अश्या वेळी कसा वागेल ? याचे समर्पक उत्तर आपल्या स्क्रीन प्ले मध्ये मांडता आले पाहिजे तर ते प्रेक्षकांना भावपूर्ण करू शकेल !