
एक राजा होता ! तो खूप शूर होता आणि त्याच खूप मोठ राज्य होत. त्याची एक राणी होती ती खूप सुंदर होती. त्या दोघांची एक राजकन्या होती. राजकन्या खूप सुंदर आणि हुशार होती. एकदा शिकार करतांना तिची शेजारच्या देशाच्या राजकुमारा शी अचानक भेट घडली. राजकुमार राजबिंडा आणि देखणा होता. दोघे एकमेका कडे आकर्षित झाले. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. त्या दोघांचा विवाह ठरला. पण राक्षसाने राजकन्येला पळवून नेले. राजकुमार तिच्या शोधात निघाला. राक्षस खूप शक्तिशाली आणि जादूटोणा करणारा होता. राजकुमार त्या बलाढ्य राक्षसाशी कसा सामना करेल अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. पण राजकुमाराने आपल्या कौशल्य आणि शक्तीच्या बळावर राक्षसाचा वध केला आणि राजकन्येला सोडवून आणले. नंतर दोघांचा विवाह झाला. The End.
समजा अशी आपली कथा आहे. खर पाहता हीच एकमेव कथा आहे. ह्या कथेत राजा राणी राजकन्या आणि राजकुमार बदलत असतात. राजा प्राण राक्षस प्रेमनाथ राजकन्या डिम्पल कपाडिया आणि राजकुमार ऋषी कपूर असला तर हि बॉबी ची कथा होते आणि बदलले सनी देओल इ. केले तर बेताब ची होईल. आणि आपण आपल्या कल्पनेच्या सहाय्याने ह्या राजा राणी राजकन्या राजकुमार आणि राक्षस ह्याच्यात आमुलाग्र बदल केला. हे सारे कुठल्याश्या दुसऱ्या ग्रहावरचे जीव आहेत असे दाखवले तर आपली कथा एकदम आगळी वेगळी होते.
ह्या एका दृष्टीने लेखकाला स्वातंत्र अफाट आहे. जे न देखे रवि ते देखे कवी असे म्हटलेले आहे ते खोटे नाही. आणि आताश्या डिजिटल क्रांती झालेली आहे. तुम्ही कल्पना कराल ते दाखवता येते. आपण ह्या अफाट स्वातंत्र चा उपयोग करू जातांना भरकटतो. खूप काही काही दाखवावे ह्या हव्यासापोटी कथे मधली भावनिकता जपायला विसरतो. आताश्या येणाऱ्या चित्रपटातून हे सारखे जाणवते. टेक्नोलॉजी काहीशी अंगावर येते. खूप भव्य दिव्य सेटिंग,कॅमेरयाच्या खूप खालीवर होणाऱ्या हालचाली. डोळे दिपवणारा प्रकाश ……… हे सगळ खूप होत आणि ज्या भावनेने आपल मन भिजायला हवं ते कोरडाच राहत ! सगळ छान असूनही ते भावात नाही. असा का होत तर ह्याच कारण आपण व्यर्थ त्या गोष्टींना भाळलो आणि आपली गोष्ट परिणाम कारक करण्यासाठी फक्त टेक्नोलॉजी वर विसंबून राहिलो. आपल्या व्यक्तिरेखा कमजोर राहिल्या. पर्यायाने आपली कथा सशक्त होवू शकली नाही.
ह्याचा अर्थ असा मुळीच नाही कि टेक्नोलॉजी काहीच कामाची नाही. ती खूप उपयोगाची आहेच. पण ती कथेच्या भावानिकतेला बळ देणारी व्हायला हवी. उत्कृष्ट सिनेमा साठी नेहमी कथा जास्त महत्वाची आहे टेक्नोलॉजी त्या खालोखाल. कथेच्या प्रसंगांना, व्यक्तिरेखांना उठाव देण्यासाठी टेक्नोलॉजी चा यथोचित वापर अवश्य करावा. तसेच टेक्नोलॉजी चा उचित वापर करण्यासाठी कथेमध्ये नाविन्य आणावे जे परिणाम कारक होईल. याचे उत्तम उदाहरण आहे हॉलीवूड चा “अवतार” ! विचार करा आपल्या किती भारतीय सिनेमाची कथा अशी होती
“ हिरो एखाद्या राज्यात किंवा हवेलीत किंवा स्मगलरच्या गन्ग मध्ये शिरतो काहीतरी महत्वाचे चोरण्या साठी ! पण तेथील मुलीच्या प्रेमात असा अडकतो कि तिच्याच साठी आपल्या पूर्वीच्या सहकार्यांशी लढतो.” हि कथा अवतार ह्या चित्रपटातून किती नाविन्य पूर्ण रीतीने, टेक्नोलॉजीचा पुरेपूर आणि यथोचित वापर करत प्रेक्षकांना क्षणोक्षणी सुखद आश्चर्याचे धक्के देत एक अविस्मरणीय अनुभव देवून जाते. एखाद्या घासलेल्या कथेच पुनरुजीवन कसे होते याचे हे उदाहरण आहे. सिनेमा लेखकाला आपल्या कल्पनेशी, आपल्या सृजनशीलतेशी असा विलक्षण संघर्ष देत कथेला आकार द्यायचे असतो. अजून काही तरी नवीन करता येईल हि तहान लेखकाने सदैव जीवंत ठेवली पाहिजे. हे दुष्कर काम कसे सोपे करावे ते आपण उद्या पाहू !
लेखका च्या आयुष्य खरच खूप सुंदर आहे ह्या येणाऱ्या चित्रपटा चा ट्रेलर
https://youtu.be/oeliddXQzjY 20 march 2013
लेखका च्या आयुष्य खरच खूप सुंदर आहे ह्या येणाऱ्या चित्रपटा चा ट्रेलर
https://youtu.be/oeliddXQzjY 20 march 2013
please write your valuable camments !
उत्तर द्याहटवाउत्तम मार्गदर्शनपर लेख..
उत्तर द्याहटवापुढील लिखाणाच्या प्रतिक्षेत..
मराठी पटकथा अभ्यासासाठी मिळेल का? किंवा कुठून डाउनलोड करता येतील
हटवामराठी पटकथा अभ्यासासाठी मिळेल का? किंवा कुठून डाउनलोड करता येतील
हटवामला मराठी कथा व पटकथा अभ्यासासाठी हवी आहे तरी मला मिळावी ही विनंती
उत्तर द्याहटवा