गुरुवार, २१ मार्च, २०१३

कथा विश्लेषण (story Analysis)

Kahaani

कथा विश्लेषण  (story Analysis)
एक राजा होता !  त्याची एक राणी होती. त्या दोघांची एक राजकन्या होती. राजकन्या खूप सुंदर आणि हुशार होती. एकदा शिकार करतांना तिची शेजारच्या देशाच्या राजकुमारा शी अचानक भेट घडली. राजकुमार राजबिंडा आणि देखणा होता. दोघे एकमेका कडे आकर्षित झाले. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. त्या दोघांचा विवाह ठरला. पण राक्षसाने राजकन्येला पळवून नेले. राजकुमार तिच्या शोधात निघाला. राक्षस खूप शक्तिशाली आणि जादूटोणा करणारा होता. राजकुमार त्या बलाढ्य राक्षसाशी कसा सामना करेल अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. पण राजकुमाराने आपल्या कौशल्य आणि शक्तीच्या बळावर राक्षसाचा वध केला आणि राजकन्येला सोडवून आणले. नंतर दोघांचा विवाह झाला. The End.

१) ही कथा कुणाची आहे ?

अर्थात राजकुमार ची किंवा बरोबरीने राजकन्येची ! ह्यांना आपण हिरो आणि हिरोइन म्हणतो. ह्यांच्या बद्दल आपणास म्हणजे प्रेक्षकास खूप सहानुभूती असते. प्रेक्षक ह्या व्यक्तिरेखेच्या बाजूनी असतो. काहीही झाले तरी आपला हिरो जिंकला पाहिजे अशी आपल्या मनाची ओढ असते. हिरो संकटात सापडला कि आपण अस्वस्थ होतो. आणि तो संकटातून सुटला हि आपण निश्वास सोडतो. हिरो संबधी हे असं होत म्हणून खऱ्या अर्थाने हि गोष्ट त्याची असते. आपण त्यालाच नायक  म्हणतो. तर नायकाची व्याख्या अशी करता येईल-
             “ज्याच्या बद्दल प्रेक्षकांना सर्वात जास्त सहानुभूती असते आणि ज्याला काहीतरी मिळवायचे असते (प्रसंगी काहीतरी संकट दूर करावयाचे असते) त्याला नायक म्हणतात.”
नायक स्री किंवा पुरुष असू शकतो तसेच नायक एक दोन किंवा चार पाच हि असू शकतात. पण प्रेक्षकांवर सयुक्तिक प्रभाव पाडण्या  साठी एक नायक ठेवणे सोयीचे असते. ह्या व्यक्तिरेखेला कथे मध्ये अनन्य साधारण महत्व असते. त्याच्या स्वभावात दिसण्यात  बऱ्याच चांगल्या गोष्टी आणावयाच्या असतात. लेखकाला हे
सार कौशल्याने करावयास हवे असते. चांगला नायक घडवतांना त्याच्यात खूप जास्त न पटणाऱ्या, न भावणाऱ्या, वास्तवापासून जरा जास्त दूर गेलेल्या गोष्टी केल्या तर तो आपला योग्य प्रभाव गमावून बसतो. हि तारेवरची कसरत जमवली पाहिजे.  ती कशी जमेल ?         21 march 2013
To get regular update please subscribe by email.
लेखकाच्या आयुष्य खरच खुप सुन्दर आहे ह्या सिनेमा चा ट्रेलर
https://www.youtube.com/watch?v=K5Nvff3T1gc

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा