वाचन
खूप वाचन हा एकमेव मार्ग आहे चांगला लेखक होण्याचा. कारण वाचन ही खऱ्या अर्थाने सृजनशील creative काम आहे. तुम्ही जेव्हा वाचन करीत असता तेव्हा स्वत:शी लक्षपूर्वक पहा तुमच्या मनात काय चाललेले असते ? जे तुम्ही वाचत असता ते दृश्य रूपाने मन:चक्षु in your mind समोर तुम्हाला दिसत असते. लेखकाने लिहिलेलि माहिती तुम्हाला फक्त मदत करीत असते.
उदा. तुम्ही वाचत आहात की, “शाम जिना चढून वरच्या खोलीत गेला.” तुमच्या मनात गोल लोखंडी जिना आला असेल ! पण लेखकाने लिहितांना सरळ, लाकडी, जिण्याची कल्पना केली असेल. अश्या प्रकारे लेखकान केलेला संपूर्ण विचार तुमच्या मनात जसाच्या तसा येत नाही. तो तुमच्या डोक्यातल्या काही कल्पनाचा आधार घेत घडत असतो. आणि हळूहळू तुमच्या आतला लेखक घडवत असतो. एकदा तुमच्या आतील सृजनशीलता (creativity) कार्यान्वित (activate) झाली कि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तुमची वेगळी दृष्टी (vision) मिळू लागते. तुम्ही एखादा सिनेमा बघता, तुम्हाला वाटते की हा सीन आवश्यक नव्हता. हा सीन थोडा नंतर दाखवला असता तर प्रेक्षकांना खिळवून ठेवता आल असत. अस आतून सुचण सृजनशीलतेच लक्षण आहे. पण -
पण ही फक्त सुरुवात आहे. आपण बालवाडी म्हणू यात. म्हणजे काय आहे की तुम्हाला शिकण्याची इच्छा निर्माण झाली आहे. आता तुम्ही प्रत्येक अनुभव वाचणा सारखा सृजनशील (creatively) रीतीने घेवू लागता. रस्त्याने दिसणाऱ्या साध्या घटनाही तुम्ही बारकाईने बघता. त्याच आतल्या आत वर्णन करू लागता. त्यात एक नाट्य बघू लागता. आता तुम्हाला बाराखडी शिकली पाहिजे. आता आपण इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला पाहिजे.
चित्रपट पाहण्याची कला
चित्रपट पाहतांना इतर प्रेक्षकां सारखा तो एन्जॉय करणे चित्रपट लेखनात तितकेसे मदत करणारे ठरणार नाही.
चित्रपटाची कथा कशी होती ? हीच कथा आणखी वेगळ्या प्रकारे मांडता आली असती का ? कोणत्या प्रकारे मांडली असती तर ती जास्त परिणाम कारक झाली असती ? सिनेमाची गती कुठे मंदावली का ? आणि का ? तो सीन महत्वाचा नव्हता कि परिणाम कारक झाला नाही म्हणून तसे वाटते ? चित्रपटातील पात्र (characters) परिणाम कारक होती का ? त्यात विविधता होती का, की ती एकसुरी होती ? प्रमुख पात्र (Hero) चे ध्येय (want) काय होते ? त्याच्या ध्येयाच्या मार्गात अडथळे (villain) काय होते ? त्यांच्यातला संघर्ष (conflict) रोमांचक होता का ? हा संघर्ष उच्च टिपेला (climax)पोहोचला का ? ह्या महत्वाच्या घटकांचा सविस्तर विचार लेखकान करायला हवा. एक खरोखर चांगला असलेला सिनेमा तुम्हाला ह्या कामात अडचणी आणू शकतो.
चित्रपटाची कथा कशी होती ? हीच कथा आणखी वेगळ्या प्रकारे मांडता आली असती का ? कोणत्या प्रकारे मांडली असती तर ती जास्त परिणाम कारक झाली असती ? सिनेमाची गती कुठे मंदावली का ? आणि का ? तो सीन महत्वाचा नव्हता कि परिणाम कारक झाला नाही म्हणून तसे वाटते ? चित्रपटातील पात्र (characters) परिणाम कारक होती का ? त्यात विविधता होती का, की ती एकसुरी होती ? प्रमुख पात्र (Hero) चे ध्येय (want) काय होते ? त्याच्या ध्येयाच्या मार्गात अडथळे (villain) काय होते ? त्यांच्यातला संघर्ष (conflict) रोमांचक होता का ? हा संघर्ष उच्च टिपेला (climax)पोहोचला का ? ह्या महत्वाच्या घटकांचा सविस्तर विचार लेखकान करायला हवा. एक खरोखर चांगला असलेला सिनेमा तुम्हाला ह्या कामात अडचणी आणू शकतो.
चित्रपट जितका उत्कृष्ट असेल तितका तो तुम्हाला निरीक्षणाच कार्य करू देणार नाही. सिनेमा उकृष्ट म्हणजे तो त्याच्या भावना वेगात तुम्हाला वाहवून नेण्यात तो बलवत्तर ठरतो. तुम्ही निरीक्षण करता करताच त्यातील दृश्यामध्ये हरवून जाता, मधेच तुम्हाला भान येते कि त्या ठिकाणी ते पात्र नेमके काय बोलले होते ? अमुक वेळेला अमुक ठिकाणी पाठीमागे कोण होते ? किंवा असेच काहीतरी आणि मग तूम्ही पुन्हा निरीक्षणाला सुरुवात करता . असे चित्रपटच तुमच्या लेखण क्रियेला मदत कानार आहेत. असेच चित्रपट आपण पुन्हा पुन्हा पहावयाचे आहेत. आणि ते अश्या पद्धतीने पाहायचे आहेत. अश्या दोन चार चित्रपटांचा अभ्यास त्याच्या स्क्रीनप्ले सोबत करणे खूप फायद्याचे ठरते. म्हणजे स्क्रीनप्ले मधून एक सीन वाचायचा, मनाशी विचार करायचा कि हा सीन पडद्यावर कसा दिसेल ? आणि मग तो प्रत्यक्ष पाहावा. स्क्रीप्ले मधल्या लिहिलेल्या शब्दांचा अर्थ पडद्यावर कळतो. लिहिलेले शब्द म्हणजे दिसणारे दृश्य असते. स्क्रीनप्ले ची भाषा आणि त्या भाषेचे व्याकरण जरा जरा कळू लागते. आणि इतर लिखाणापेक्षा (कथा कादंबरी नाटक ) स्क्रीनप्ले लिखाण कस वेगळ आहे हे उमगायला लागत. पटकथा संवाद लेखण शिकण्याची खरी सुरुवात होते.
निरीक्षण
वाचन हा एकमेव मार्ग आहे चांगला लेखक होण्याचा. वाचन तुमची कल्पना शक्ती वाढवत. त्याच प्रमाणे तुमची निरीक्षण शक्ती हि वाढवत. तुम्ही वाचून अनुभवलेलं मन:चक्षुंनी पाहिलेलं, जसच्या तसं किंवा मिळत जुळत काहीतरी प्रत्यक्षात दिसत, तेव्हा तुम्ही त्यातले बारकावे निरखून पाहाता. अशी तुमची निरीक्षण क्षमता वाढीस लागते .
समजा तुम्ही एक एक्सिडेंन्ट संबंधी खूप छान वर्णन वाचलं आहे. आणि दोन चार दिवसातच तुम्हाला रस्त्या वर एक एक्सिडेंन्ट झालेला दिसला. तुम्ही त्या वाचलेल्या वर्णनाशी पहात असलेल्या दृश्याशी तुलना करता. दोन्ही अनुभवातून एक नवीन दृश्य तुमच्या मनात तयार होत जात.
मग हळूहळू अश्या बऱ्याच गोष्टी तुमच मन संग्रहित करायला सुरुवात करत. नाट्यपूर्ण दृश्यांची एक लायब्ररी तुमच्या अंतर्मनात तयार होत जाते. हि लायब्ररी तुमच्या लेखन जीवनाची शिदोरी आहे. ह्या बद्दल आपण पुढे बोलू. वाचनातून आणि निरीक्षणातून आपली हि शिदोरी आपल्याला ठासून भरून ठेवता आली पाहिजे.
रत्याने चालणारी माणसे, कशी चालतात ? त्यांची लकब कशी आहे ? ती का असावी ? बोलण्याची ढब कशी आहे आणी का असावी ? आपल्या नातेवाईकां मध्ये घडणाऱ्या घटना ! ऐकिवात येणाऱ्या घटना ! वर्तमान पत्रातील घटना ! टीव्ही न्यूज ! इंटरनेट ! अनंत मार्गाने अनंत दृश्य आपल्या भोवती प्रवाहित होत असतात. आपल्या अंतर्मनाने त्या टिपून घेतल्या पाहिजेत. ऐनवेळी त्या कश्या उपयोगात आणायच्या ते आपण पुढे पाहू.
पण निरीक्षणातून तुम्ही जतन करून ठेवलेल्या सर्व गोष्टी हा तुमचा अमुल्य खजिना ठरणार आहे. प्रत्येक निरीक्षण हे तुम्ही खरेदी करून ठेवलेली रिअल प्रापर्टी आहे. तुम्ही या जमिनीवर कधीही चित्रपटाची बिल्डींग उभारू शकता.
नाट्यपूर्ण अनुभवांची भेळ

दुसरी गोष्ट ह्या अनुभवांशी करावयाची असते ती अशी की, ह्या सर्व अनुभूतींना वेगवेगळे लक्षात ठेवायचे नाही. खरे पाहता ते शक्य नाहीच, पण तरीही कधी कधी हे कठीण काम करावयास आपले मन आपणास भाग पाडते. आपण हे विसरून जावू कि काय ? हा प्रश्न आपणास भेडसावतो. आणि आपण हा दुर्घट प्रयोग करू लागतो. त्यात आपली खूप सारी उर्जा वाया जाते असे मला वाटते. ह्या उलट ह्या सर्व अनुभवांची आपल्या मनामध्ये सरमिसळ झाली पाहिजे. ह्या सर्व अनुभवाच्या फापट पसार्याचे यथा योग्य रसग्रहण व्हायला पाहिजे. साध्या भाषेत पचन झाले पाहिजे. ह्यामुळे होते काय की, प्रत्येक प्रसंग वेगळा आठवला नाही तरी त्याचा परिपाक आतून (unconsciously) काम करतो. ह्या प्रकारे अंतर्मनातून आलेले वर्णन प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेवू शकते.
आपल्या अनुभवाची हि सरमिसळ आणखी एका प्रकारे उपयोगी पडते ती अशी, आपल्या स्मृतीतला एक अनुभव दुसऱ्या अनुभवा सोबत जुळतो आणि एक वेगळ परिणाम कारक रसायन हाती लागत.
उदा- आपण ऐकलेला एखादा खुनाचा प्रयत्न आणि बर्याचदा येणारा मिसकॉल चा आपण समन्वय केला. एखाद्या ठिकाणी खून होतो आहे आणि नेमका तिथेच कुणाचा तरी मिसकॉल येतो. हा फोन कुणाचा यावर खुनी घाबरतो. अश्या प्रकारे एखाद्या नाट्यपूर्ण प्रसंगाची निर्मिती होवू शकते.
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की सगळे अनुभव विसरून जावेत. काही महत्वाच्या घटना लक्षात ठेवणे गरजेचे आहेच. पण त्या सर्वांची सरमिसळ करणही तितकाच आवश्यक आहे.
नाट्यपूर्ण अनुभवांची ही भेळ आपल्या लिखाणाला आगळी वेगळी लज्जत आणल्या शिवाय राहणार नाही.भूक
आपणास जश्या काही शारीरिक गरजा असतात. भुक तहान इ. तश्याच काही मानसिक गरजा असतात. त्यातली एक अक्राळ विक्राळ भूक असते कहाणी ची भूक ! आपण सदा सर्वदा कुठल्या ना कुठल्या कथेचा भाग असतो. आपल्या भोवतालचा प्रत्येक माणूस काहीना काही गोष्ट घडवीत असतो. तुम्ही गप्पा करतांना लक्ष देवून ऐका प्रत्येक जण काहीतरी बोलण्यासाठी धडपडत असतो. सकाळी ओंफीस ला येतांना अस अस घडलं ! बायको पाय घसरून पडली आणि अमुक टमुक झालं ! मुलाच्या शाळेत घडलेली ! मित्राच्या घरी घडलेली ! कुणाच्या जन्माची ! कुणाच्या मरणाची ! कुणी मरता मरता वाचल्याची ! अनेक ! अनंत कथा सदैव आपण ऐकत असतो आणि सांगत असतो. आणि हे सुद्धा अपूर पडत की काय आपण झोपेतही कथा अनुभवतोच ……… आपण स्वप्न पाहतो.

हे अस का होत ? का माणूस सदा सर्वदा कोणत्या तरी कहाणीचा भाग असतो. ? कारण असं आहे कि कथा ही माणसाच्या जगण्याच अविभाज्य साधन आहे. कथा आपल्याला बौद्धिक आणि भावनिक खाद्य पुरवते. ह्यात कथेतून आपली बौद्धिक भूक फार कमी प्रमाणात पूर्ण होते, पण भावनिक भूक फार मोठ्या प्रमाणात भागते. किंबहुना भावनिक भूक भागवण्या साठीच आपल्याला कथा अनुभवावी लागते.
अतिशय महत्वाची गोष्ट चित्रपट कथा लिहिणाऱ्या लेखकाला लक्षात घ्यायला हवी ती हीच की आपल्या कथेतून श्रोत्यांची किंवा प्रेक्षकांची भावनिक भूक भागवता आली पाहिजे.
ह्यात एक बारकावा लक्षात घेण्या सारखा आहे कि आपणास असे वाटेल माणसाला आनंदित व्हायला आवडेल, रोमांटिक व्हायला आवडेल ! आणि अश्या काही छान छान सुखी समाधानी गोड गोड अनुभवच माणसाला आवडतील. पण कथेच्या बाबतीत असे नाही. कथेत माणसाला त्याच्या अभिरुची नुसार कमी जास्त पण सगळेच अनुभव घ्यायला आवडतात. त्याला घाबरायला ही आवडत ! त्याला संकटात पडायलाही आवडत ! त्याला धोक्याच्या , प्रसंगी मरणाच्या जवळून जायलाही आवडत !
महत्वाच कारण अस आहे की, कथा खोटी असते ! जे काही होणार आहे ते कागदावर आपल्यासाठी पडद्यावर होणार असत. जे अनुभव खऱ्या जगण्यात घेता येत नाहीत तेच माणसांना चित्रपटात घेता येतात. आणि हे होण्यास त्यांना मदत कारण हेच कथा लेखकच काम होवून बसत. अश्या कथांचा शोध कसा घ्यावा ?
"आयुष्य खरच खूप सुंदर आहे" ह्या चित्रपटाचा ट्रेलर लिंक https://www.youtube.com/watch?v=pqvGG26cYY0
"आयुष्य खरच खूप सुंदर आहे" ह्या चित्रपटाचा ट्रेलर लिंक https://www.youtube.com/watch?v=pqvGG26cYY0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा