उत्तम कथेत काय असते ? (contents of Good story)
एकदा आपली कथा तयार झाली कि काही प्रश्न आपण स्वत:ला विचारून पाहावेत. म्हणजे आपली कथा खरोखर चांगली जमली आहे की नाही ते लक्षात येईल.
१) आपल्या कथेत नाविन्य आहे का ?
आपली एक गोची सर्वदा होण्याची शक्यता फार असते. ती म्हणजे आपण आपली कथा कल्पना चांगलीच आहे असे गृहीत धरून चालतो. आपण मित्रांना विचारतो पण त्यातही बर्याचदा योग्य सल्ला मिळतोच असे नाही. सिनेमात व्यवसायिक गणित तपासून पहिले पाहिजे, अश्या आशयाचा तू एखादा चित्रपट पाहिलायेस का ? असे प्रश्न विचारावे, मिळाले तर ते चित्रपट पाहावेत. वाचन करावे आणि नक्की करावे कि आपली कथा खरोखर नाविन्य पूर्ण आहे.
मग ते नाविन्य कथेत नसेल कदाचित पण मांडणीत असेल ! व्यक्तिरेखांच्या मुलभुत स्वभावात असेल ! आपण त्याच प्रसंगाच्या जास्त खोलात शिरलो असू ! एक नवा दृष्टीकोन आपण दाखवत असू ! ह्या संदर्भात एक खूप चांगले उदाहरण आहे. राजश्री ह्यांचा नदीयाके पार आणि “हम आपके है कौन ?” हे दोन एकाच कथेवर झालेले सिनेमे आहेत. ज्यांनी हे दोघे सिनेमे पाहिलेले आहेत त्यांना हे जाणवेल .
आपल्या कथेत किंवा विषयात जर वेगळेपण नसेल तर ते कसे आणावे हे ह्या दोन सिनेमा बघून समजू शकेल. नाविन्य आणण्याचे मार्ग अनंत असतील आपण कल्पनाशक्ती ने पाठपुरावा करायला हवा असतो.
तो जुना काळ होता, त्या काळात भावा भावाच्या लहानपणी हरवणे आणि मोठे झाल्यावर एकमेकांचे शत्रू बनून भेटणे, ह्या कथेवर डझनांनी सिनेमा आले आणि बर्यापैकी चालले सुद्धा ! पण आता तास नाहीये. आता करमणुकीची साधन जरुरी पेक्षा जास्त आहेत. प्रत्येकाच्या खिश्यात करमणुकी साठी मोबाईल आहे, एमपीथ्री प्लेअर आहे, tab आहे. आणि काय काय ! आता काहीतरी अनोख ! खूप उद्दीप्त करणार ! खळबळ निर्माण करणार अस द्यायला हवं आहे. खूप मोठ्या गोष्टी आता सोप्या वाटू लागल्या आहेत. कदाचित छोट्या गोष्टीमध्ये दडलेला मोठा अर्थ उलगडण्याची आता गरज आहे. नाविन्याचा शोध कसोशीने घ्यायला हवा. याला पर्याय नाही !
मार्च २६
तर तुम्ही मला मधेच थांबवाल आणि तू खोटे बोलतो आहे असे म्हणाल. आणि ते अगदी साहजिक आहे. तुम्हाला माझ्या सांगण्यावर विश्वास बसणार नाही. पण मी अरे ऐकतरी असे म्हणत पुढे सांगू लागलो की,
2) संघर्ष (Conflict)
काहीतरी संघर्ष असल्या शिवाय कथा घडत नाही. एकदा आजी आपल्या नातवाला गोष्ट सांगत होती. हीच राजकन्येची एक राजा होता, एक राणी होती, त्याची मुलगी खूप सुंदर राजकन्या तिला एक राजकुमार भेटला सार काही छान छान सागत होती पण नातू कंटाळला ! म्हणाला अग आजी राक्षस केव्हा येणार ?
![]() |
Conflict |
कहाणीत राक्षस शिरल्या शिवाय संघर्ष होत होत नाही. संघर्ष म्हणजे फक्त फायटिंग नव्हे ! नायकाला जे हवे आहे (राजकन्या) ते मिळवण्यात येणाऱ्या अडचणी, आणि मग ते (राजकन्या) त्याला मिळेल कि नाही हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे. आणि तो जेव्हा प्रेक्षकांच्या मनाला भिडतो, प्रेक्षक स्वत: अंर्त:मनाने (subconsciously) विचार करू लागतो कि असे असे होईल. पण पडद्यावर तसे होत नाही काहीतरी अनपेक्षित घडते. आणि हे अनपेक्षित त्याला सुखद आश्चर्याचा धक्का देते. हे अनपेक्षित त्याला बुचकळ्यात टाकणारे नसले . अशक्य वाटणारे नसले, तरच त्याला (audience) भावते, आवडते. आणि तो ह्या सुखद भावनेतून सावरतो न सावरतो तोच पुन्हा नायक किंवा नायिका दुसऱ्या अडचणीला सामोरे जाते. पुन्हा प्रेक्षक अंर्त:मनाने, आपल्या स्वत:च्या कल्पनेने काहीतरी अंदाज बांधतो आणि पुढच्या सुखद धक्क्या साठी तयार होतो. हि अडी अडचणी ची अखंड साखळी प्रेक्षकाला एका उंचीवर घेवून जाते. आणि एका सर्वोच्य (Climax) बिंदूवर संपूर्ण समस्येचे परिणाम कारक निराकरण करते. नायकाला (नायिकेला) हवे ते मिळते (सुखांत) किंवा कधी कधी मिळत नाही(दुखा:न्त) प्रेक्षक हा आगळा वेगळा अनुभव घेवून बाहेर पडतो.
संघर्ष असल्या शिवाय सिनेमा होवूच शकत नाही. संघर्ष दोन प्रकारचा असतो. बाह्य भौतिक संघर्ष आणि दुसरा आंतरिक संघर्ष
१) बाह्य भौतिक संघर्ष (External conflict) -
राजकुमाराला राजकन्या हवी आहे किंवा राजकन्येला राजकुमार शी लग्न करायचे आहे. किंवा नायकाला एखादा डायमंड चोरून आणायचा आहे. खलनायकाला संपवायचे आहे. अश्या प्रकारच्या ध्येयात येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्याशी होणारा संघर्ष हा बाह्य भौतिक संघर्ष म्हणता येईल. याची उदाहरणे खूप सापडतील. असा संघर्ष लिहिणे दाखवणे सहज सोपे असते.
२) आंतरिक संघर्ष ( Internal Conflict )
नायकाच्या मनात नैराश्य आलेलं आहे. तो आपली हिम्मत घालवून बसलेला आहे. त्यावेळी त्याला स्वत:ला आपल्या मनातल्या ह्या गोष्टीवर मात करायची आहे. किंवा त्याचे मित्र, प्रेयसी, किंवा टीचर इ. कुणीतरी त्याच्या मनात उत्साह भरण्याच काम करत. सहसा आपली भारतीय सिनेमात अश्या वेळी गाण टाकल जात. “‘लगान” सिनेमाच च उदाहरण घेतलं तर “ओ पालनहारे” अश्या प्रकारचा संघर्ष दाखवायला कठीण असतो. कारण सिनेमा हे मुळात: दाखवायचे माध्यम आहे. आणि मनात किंवा डोक्यात चालणाऱ्या गोष्टी दाखवता येत नाहीत. त्यासाठी तो बोलावंच लागत आणि डायालोग खूप झाले कि दृश्य भाग कमी होतो. त्यासाठी समर्पक असा नाट्यपूर्ण प्रसंग बनवावा लागतो. ज्यातून व्याक्तीरेखाचा आंतरिक संघर्ष दिसून येईल.
सर्व यशस्वी सिनेमा मध्ये नाविन्य पूर्ण संघर्ष वापरलेला दिसेल. तास पाहिलं तर हा पक्का फार्मुला आहे.
फार्मुला म्हणजे प्रत्येक कथेमध्ये संघर्ष असायला हवा एवढीच गोष्ट कॉमन आहे. संघर्ष नाविन्यपूर्ण कसा करावा याचा काहीही फार्मुला नाही. तो ज्याचा त्याचा आपण आपल्या प्रत्येक कथेसाठी वेगळा शोधला पाहिजे . प्रत्यक कथेच्या वेळी हि चित्रपट लेखकाची खास परीक्षा असते. मार्च २७ 3) विश्वसनीयता (believability)
विश्वसनीय म्हणजे वास्तविक असा अर्थ घेतला तर फक्त सत्य घटनाच सागंता येतील. फारतर सत्य होवू शकतील अश्या गोष्टी लिहाव्या लागतील. मग परीकथा, सायन्स फिक्शन, भयकथा (भूत प्रेत ) निकालात निघतिल.
समजा मी तुम्हाला म्हणालो कि काल मी माझ्या घरात भूत पहिले.

माझ्या टीव्ही तून ते भूत बाहेर आले आणि माझा नाश्ता त्यानेच फस्त केला. मग माझ्याशी भांडू लागले कि त्याला हवे ते चैनेल मी त्याला पाहू द्यावे. इ. बरेच काही मी तुम्हाला सागंतो आहे तर तुम्ही मला न थांबवता मी काय सांगतो हे बर्याच इंटरेस्ट नी ऐकू लागाल. हो की नाही !
काय झाले माझी धादांत खोटी असलेली गोष्ट खरी झाली का ? नाही ! ती खोटीच आहे पण मी तुम्हाला विश्वास ठेवायला काही काळापुरत का असेना भाग पाडलं आहे. त्या खोट्या गोष्टी तून मी तुमची उत्सुकता ताणून नेली आहे. त्यात एक गंमत आणली आहे. आणखी काय गंमत ऐकायला मिळते ह्यात औत्सुक्य निर्माण केले.
आपली कथा विश्वसनीय असावी ह्याचा खरा अर्थ हा असा आहे.
खरे पाहता सत्य घटने पेक्षा काल्पनिक कथेतच जास्त मोठे नाट्य असते. पण त्यात ते नाट्य आणतांना लेखकाला आपले कौशल्य पणाला लावावे लागते. Harrypotter चे सिनेमे आपल्या कडचा शक्तिमान, लहान मुलाचे सगळे चित्रपट सिरियल्स काल्पनिक खोट्या गोष्टीमध्ये विश्वसनीयता निर्माण केल्या मुलेच यशस्वी होतात.
पुन्हा एक गोष्ट नमूद केली पाहिजे कि काल्पनिक कथानाच फक्त विश्वसनीयता निर्माण करावी लागते असे नाही, तर वास्तविक जीवनातल्या कथाना देखील हि मेहनत करणे आवश्यक असते. सत्य घटनेवर जरी तुम्ही कथा लिहित असाल तरी ती खरी वाटावी म्हणून बऱ्याच युक्ती वापराव्या लागतात. नाट्यपूर्ण नसलेले पाल्हाळीक प्रसंग कसे टाळावेत किंवा कमी काळात कसे दाखवावेत. मध्ये गेलेला आठ दहा वर्षांचा काळ कसा दाखवावा. तुम्ही सांगत असलेली कथा सत्य घटना असेली तरी ती तेव्हाच परिणाम कारक होते जेव्हा ती मनाला भिडते, आणि मनाला विश्वास बसल्या शिवाय ती भिडू शकत नाही. याचे उत्तम उदा. “मी सिंधुताई सपकाळ” हि कथा सांगताना दिग्दर्शकाने विमानात प्रवास करता करता स्वत: सिंधुताई आपली कर्म कहाणी सांगते आहे आणि फ्लश बॅंक पद्धतीने कथा उलगडत जाते असे दाखवले आहे. अगदी समर्पक ठिकाणी ती कथा पुन्हा विमानात येते आपला परिणाम साधते आणि पुन्हा पूर्वायुष्यात घेवून जाते.
विश्वसनीयता हा कथेचा आत्मा आहे असाही म्हणता येईल. आता आत्मा जिवंत माणसात असतो असही मानायला कठीण परिस्थिती आहे. पण कथेमध्ये जिवंतपणा आणायचा तर ती आता या क्षणी घडते आहे हे पटल्या शिवाय कुणीही ती पाहण्यात स्वारस्य घेणार नाही . सत्यकथेही तही ती तितकीच आवश्यक आहे जितकी अतिशय अदभुत मध्ये आहे. सिनेमा बघत असतांना हि विश्वसनीयता जपली गेली पाहिजे, त्या क्षणी ती साक्षात खरी वाटली पाहिजे. तरच आपण अपेक्षित परिणाम साधू शकू. मार्च २८
चित्रपट पाहतांना माणूस जर भावूक झाला नाही तर चित्रपट सर्वथा अयशस्वी झाला आहे असे सावजावे. भरत मुनींच्या नाट्य शास्त्रात नऊ रस सांगितले आहेत. ह्या माणसाच्या वेगवेगळ्या भावना आहेत. शृंगार रस, कारुण्य रस, रुद्र रस, वीर रस, हास्य रस, बीबत्स रस, भयानक रस, अदभुत रस, शांत रस. असे ते रस अर्थात भावना आहेत या बद्दल अधिक माहिती http://www.rasas.info/ येथे मिळेल. ह्या पैकी कुठल्या न कुठल्या रस्ची निष्पत्ती झाली पाहिजे. म्हणजे काय तर शृंगार (sex म्हणण चुकीच ठरेल) जागृत झाला पाहिजे किंवा रडायला आल पहिजे (कंठ दाटून येणे, ऊर भरून येणे) किंवा संताप आला पाहिजे, किंवा शौर्य मनात भरून आल पहिजे, किंवा हसायला आल फाहीजे, किंवा किळस वाटली पाहिजे, भीती वाटली पाहिजे किंवा आश्चर्य वाटल पाहिजे. आणि कुठलंच नाही वाटल तर मनाला शांत वाटल पाहिजे. ह्या वेगवेगळ्या भावनाचा अनुभव घेण्यासाठीच तर प्रेक्षक सिनेमा गृहात येत असतो. आपण चित्रपट लेखनासाठी कितीही मेहनत घेतली आणि भावना उद्दीप्त नाही करू शकलो तर सार व्यर्थ आहे. मनुष्य प्राणी भावना प्रधान प्राणी आहे. तो भावनांशिवाय जगूच शकत नाही. जो पर्यंत तो जिवंत आहे, तो पर्यंत त्याच्या मनात भावनांचा खेळ चालूच असतो. तरीही अजून काही विशेष वेगळ्या अद्वितीय भावनांचा अनुभव घेण्यासाठी तो सिनेमा पाहतो. आणि त्याची हि तहान आपल्या कथेतून भागली तरच आपला व्यवसाय चालू शकतो.
विश्वसनीयता हा कथेचा आत्मा आहे असाही म्हणता येईल. आता आत्मा जिवंत माणसात असतो असही मानायला कठीण परिस्थिती आहे. पण कथेमध्ये जिवंतपणा आणायचा तर ती आता या क्षणी घडते आहे हे पटल्या शिवाय कुणीही ती पाहण्यात स्वारस्य घेणार नाही . सत्यकथेही तही ती तितकीच आवश्यक आहे जितकी अतिशय अदभुत मध्ये आहे. सिनेमा बघत असतांना हि विश्वसनीयता जपली गेली पाहिजे, त्या क्षणी ती साक्षात खरी वाटली पाहिजे. तरच आपण अपेक्षित परिणाम साधू शकू. मार्च २८
4) भावुकता ( Emotionality)

विचार करा तुम्ही एखादी घडलेली घटना मित्राला सांगता ! का सांगता ? त्यात काही विशेष असेल तरच सांगता ! बरोबर ! जर नेहमीचच जेवण प्रवास हे आपण बोलत नाही. आपण तेव्हा बोलतो जेव्हा अपघात झाला किंवा होता होता वाचला, एका मिनिटा करता माझी बस चुकली, बोलण्यातली चूक किंवा ऐकण्यातली चूक गैरसमज अश्या कुतूहल किंवा काहीतरी रस निर्माण करणाऱ्या गोष्टी आपण बोलतो. पण रोजच्या जगण्यात तेवढ्या रसांची चव चाखता येत नाही, म्हणूनच लोक करमणुकीकडे वळतात.
आपल्या कथेत रसांच्या वेगवेगळ्या छटा निर्माण होत राहिल्या पाहिजेत. हसता हसता रडवण, एकदम भीतीच्या मिठीत टाकून क्षणात त्यातून सोडवण. हलके हलके शृंगार रसाचे हळुवार स्पर्श. तर कधी खूप जास्त आवेगी. प्रेक्षकांना भावनांच्या मोठमोठ्या हिंदोळ्या वर झुलवत ठेवलं पाहिजे. हा भावनांचा प्रवास जितका अनन्य साधारण तितकी तुमच्या सिनेमाची यशस्विता मोठी. सिनेमा एकदा पाहून मन भरल तर तो सिनेमा नाहीच, अस मला वाटत. सिनेमा पुन्हा पुन्हा पहावासा वाटला पाहिजे. याकरिता चित्रपट लेखकाने खूप खूप विचार करावा आणखी काय करता येईल ? आणखी काय करता येईल ? आपण खरोखर समाधानी होत नाही तोपर्यंत मेंदूला कुरतडल पाहिजे मेंदू देतो ----- वेगवेगळ सुचत पण आपण अडून राहील पाहिजे. आपण ओ के झाल मिळाल अस म्हटलं कि मेंदू थांबतो. मेंदूला चालवल पाहिजे. तो चालतो कितीही …………. !
मार्च 30
५) कथेचा आत्मा (Soul of the Story)
आपल्या एका मित्राने इ मेल करून विचारले आहे कि कथेचा आत्मा ह्या बद्दल जर विस्ताराने सांगाल का ?
विचारले आहे तेव्हा जमेल तसे सांगायला हवेच, मी जमेल तसे म्हणतो कारण आत्मा आहे हे सिद्ध करता येत नाही, तसेच आत्मा नाही हेही सिद्ध करता येणार नाही. त्या बद्दल भरपूर येवू शकेल पण एकूण किंवा वाचून आपल्या कुठल्या तरी दिशेला प्रवास झाला पाहिजे. तर हा प्रवास होईल अशी अपेक्षा करू या.
आत्मा आहे हे आपण कसे पटवू शकतो. दुसऱ्या कुणाला नाही तर स्वत:ला. एखादी वस्तू आहे. समजा एखादी कार आहे. ती कर आहे हे आपण मान्य करतो कारण तिला चार चाकं आहेत. आत बसायला सीट्स आहेत. मशीन आहे, पेट्रोल टंक आहे, स्टेरिंग आहे. इ. सर्व आहे.
![]() |
Ghost of the STORY |
आता विचार करा कि चाक म्हणजे काही कार नव्हे. तर आपण चाक काढून टाकू या. एक चाक काढून टाकले तसेच दुसरे चाक म्हणजेही कार नव्हेच आपण तेही काढून टाकू. असे आपण चारही चाकं काढून टाकलेत. कार मधली बसायची सीट्स म्हणजे काही कार असू शकत नाही. आपण सगळी सीट्स काढून टाकलीत. ह्याच प्रमाणे मशीन म्हणजे काही कार नाही आपण मशीनही काढून टाकले. पेट्रोल टंक, स्टेरिंग ही काढून टाकले. तर झाले ? कार ही अचानक नाहीशी झाली. आपण कार नाहीशी करण्याचा प्रयत्न केला नाही तरी कार नाहीशी झाली. ह्या विचित्र प्रयोगातून काय सिद्ध होते ? तर कार म्हणजे ह्या सर्व (चाकं, सीट्स, मशीन, पेट्रोल टंक, स्टेरिंग) वस्तूंचा संयोग आहे. ह्या सर्व वेगवेगळ्या वस्तू मिळून कर बनते.
ह्यसर्व वस्तूंचा संयोग होतो आणि ह्यांची बेरीज हि खरोखर बेरजेपेक्षा जास्त भरते. त्यात चाकं, सीट्स, मशीन, पेट्रोल टंक, स्टेरिन्ग ह्या सर्व वस्तू तर असतातच पण कारही अस्तित्वात येते. कार हि काहीतरी अधिक वस्तू आपणास मिळते. आपल्या शरीराचे ही असेच आहे. आपण म्हणजे हात पाय छाती किंवा आपले सारे अवयव म्हणजे आपण नसतो. ह्यासर्वाचा संयोग होवून आपण बनतो. आणि आपण किंवा कुण्याही शरीरातला तो व्यक्ती त्यात असलेल्या संयोगीत घटकापेक्षा अधिक असतो. तो च जिवंतपणा असतो. त्याला आपण आत्मा म्हणू शकतो.
कथेचेही असेच असायला हवे. आपण जुळवून आणलेल्या सर्व घटकापेक्षा जास्त त्यांची बेरीज भरली पाहिजे.
आता पहा आत्म्या बद्दल पटवून देणे खूप कठीण असते पण तो असतो. कथेतल्या आत्मा म्हणता येईल अश्या भाग बद्दल हि पटवून देता येणार नाही , वर्णन करून सांगता येईल कदाचित पण प्रत्यक्ष एखाद्या सीनमध्ये, एखाद्या व्यक्तीरखे मध्ये ठोसपणे दाखवता येणार नाही. असा काहीतरी सारांश असल्या सारखा भाग कथेमध्ये संयोगातून आपसूक निर्माण होतो, त्याला कथेचा आत्मा म्हणता येईल.
लक्षात घ्या आत्मा आपण आणून टाकू शकत नाही. आपल्या घटना जिवंत , व्यक्तिरेखा जितक्या मन:पूर्वक तितकी आत्म्याला व्यक्त होण्यास जागा मिळते. आपण आम्याला व्यक्त होण्या साठी फक्त जागा निर्माण करू शकतो आपण आत्मा आणू शकत नाही. आपण फक्त दार किंवा खिडकी उघडू शकतो सूर्य प्रकाश आपोआप आत येतो, प्रकाश आत आणावा लागत नाही. आपण फक्त पर्यंत करू शकतो आणि आपण तो मन:पूर्वक करावा.
उद्या पासून आपण प्रत्यक्ष लिखाणाला सुरुवात करू. कथेचे तीन भाग कसे आणि का करावे ते पाहू . एप्रिल ०4
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा