
चित्रपट लिखाणास सुरुवात करतांनाच लेखकाला आपले ध्येय निश्चित करावयास पाहिजे. साधारणत: नवोदित लेखक एखाद्या सुपर हिट चित्रपटाने झपाटलेला असतो. त्या चित्रपटाच्या यशाला पाहून मोहात पडलेला असतो. त्यातल्या सारखे दिसणारे, वागणारे पात्र योजना, त्या कथेशी मिळती जुळती कथा, किंवा कथेचा विषय इ.
हे करण्यात कदाचित व्यावसाईक यशाचे गणित जुळते पण ते एक मर्यादित यशच फक्त देवू शकते. ह्याप्रकारे केलेल्या कलाकृतीला अद्वितीय यश किंवा मान्यता मिळू शकत नाही. प्रतिथ यश म्हणजे सुपरहिट चित्रपटांच्या पावलावर पाऊल टाकून तयार केलेल्या चित्रपटांचा इतिहास पाहिला तर हे सहज लक्षात येईल.
त्यामुळे सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावयाची ती ही की, आपण स्वत;ला अनुकरण करण्यापासून वाचवावे. अति उत्तम अनुकरण सुद्धा कधीही सृजनशील(creative) असू शकत नाही.
मग नव्या चित्रपट लेखकाने काय करावे ? तर ह्या सुपरहिट चित्रपट मधून हा अभ्यास करावा की ह्या लेखक किंवा दिग्दर्शकाने कश्या प्रकारे नाविन्याचा शोध घेतला आणि तो काय काय करून परिणाम कारक बनवला. त्या पद्धतीने आपणही आपल्या आसपास निरीक्षणातून लोकांच्या जीवाभावाचे विषय शोधावेत. वेगवेगळे कथासूत्र चर्चा करून सामान्य माणसांची रुची ओळखता येवू शकते. लहान मुलही ह्या बाबतीत खूप मदत करू शकतात. मुलांना आपल्या मनातली गोष्ट सांगावी (अर्थात मुलांच्या योग्य असेलतर) मुल जर कुतूहलाने भरून जात असतील तर ती गोष्ट परिणाम कारक आहे असे मानण्यास हरकत नाही. अश्या विविध प्रकारे आपला विषय नक्की करावयाचा असतो.
चित्रपट लेखकाच कार्य इतर लेखकापेक्षा बऱ्यापैकी खडतर असत. सर्व साधारण कथा कादंबरी इ. लेखकांच लिखाण सरळ सरळ वाचकाच्या हातात जात, आणि आपला परिणाम साधत. पण चित्रपट लेखकाची संहिता कुणी वाचत नाही, वाचू शकत ही नाही. सामान्य वाचकाला ती समजणार ही नाही. येथे त्या संहिते वरून तयार झालेला चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येतो. ज्याच्यावर अनेक जणांनी आपले संस्कार केलेले असतात. दिग्दर्शकाने सांगितल्या प्रमाणे अभिनेते काम करतात. पण सारे अभिनेते आपापली छाप सोडून जातातच. वेशभूषा रंगभूषा कर आपापले संस्कार करतात. हे सारे छाया चित्रकार आपल्या तऱ्हेने चित्रित करतो. एडिटर आपले संस्कार करतो आजकाल व्ही एफ एक्स आणि कम्प्युटर ग्राफिक्स इ. अनेक संस्कार होतात. त्यानंतर लेखकाची कलाकृती प्रेक्षकाच्या समोर जाते. ह्या सर्वांचे संस्कार काय होतील ह्याचे भान ठेवून लेखकाला लिहायचे असते. आणि हा प्रकार बर्यापैकी कल्पनेला त्रासवणारा , शीण आणणारा असतो.
आयुष्य खरच खूप सुंदर आहे ह्या चित्रपटाचा ट्रेलर https://youtu.be/BtdrlSiAAe4
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा