कथेचा विषय (subject)
A film cannot be any good if it isn’t well written.
कथा नक्की झाली तर आपणास त्या संबधी संशोधन करावे लागते, आपल्या कथेचा काळ कोणता ? उदा. स्वातंत्र पूर्वीचा ? पेशवे कालीन ? इ. त्या लोकांची भाषा, बोलण्याची लकब, पेहराव इ. बाबतीत सखोल माहिती मिळवावी लागते. कथा सर्वथा काल्पनिक असेल तर ती भाषा कशी असेल ? वेशभूषा कशी असेल ? घरे फर्निचर शोभेच्या वस्तू, वाहने काय काय शोधावे लागेल हि यादी खूप वाढत जाणारी असते.
पण विषय निश्चिती अगोदर केली तर आपणास जरा जास्त संशोधन करावे लागते. त्या विषयाच्या अनुषंगाने काय काय लिखाण झाले आहे ? कोणत्या फिल्म बनल्या आहेत ? त्या विषयीच्या विविध लेखांचा अभ्यास ? त्या विषयातील तज्ञांच्या मुलाखती घेणे, त्या अनुसार कथेची अथवा प्रथम पात्राची (Hero) निर्मिती करावी लागते.
एकंदर विषयातून कथा किंवा सरळ कथा मिळाली म्हणजे काम पूर्ण झाले असे समजू नये कारण आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झालेली असते. स्क्रीन रायटर चे काम फक्त डायलॉग आणि त्यांच्या कृती (activity) लिहिणे नसते. स्क्रीन रायटर ला संपूर्ण एकसंध कथेचे वेगवेगळे तुकडे करावयाचे असतात. कोणकोणत्या ठिकाणी हि कथा घडते त्यानुसार ! कोणकोणत्या वेळेला हि कथा घडते त्या नुसार ! त्या ठिकाणांची (locations) सखोल माहिती निर्माण करावी लागते. उदा. बगंला आहे तर त्यात असणारे फर्निचर, जिना, तिथली श्रीमंती, ( असलेली किंवा नसलेली) तिथले कारपेट, दरवाजा, खिडक्या इ. सारे डीटेल्स निर्माण करावे लागतात. कोणत्या वेळेला आपले पात्र (character) जिन्यात असेल ? कधी खिडकीत असेल ? त्याच्यावर प्रकाश कसा किती असेल ? आजूबाजूला कोणते आवाज येत असतील ? कोणत्या ठिकाणी तो कसा बसेल ? कसा उठेल ? धावेल ? काय काय करेल ? आणि ते प्रेक्षकांना कसे दिसेल ? चित्रपट लेखकाला हे सारे सुसंगत रीतीने मांडावयाचे असते.
याचा सर्वचा अर्थ असा नाही कि स्क्रीन रायटरला उत्कृष्ट sound engineer, Cinematographer, set designer, किंवा Electrician असण आवश्यक आहे. स्क्रीन रायटरला डायरेक्टर पेक्षा जास्त नॉलेज असायला हवं की लीडिंग एक्टरच कौशल्य असायला हव ? तर असं नाहीये, पण स्क्रीन रायटरला हे सगळे कसे होईल ? जमेल कि नाही याचा अंदाज असायला हवा. आपण जे लिहितो आहोत ते पडद्यावर आणण्या साठी काय करावे लागेल ? ते कसे होईल हे समजलेले असले तर आपण ते ठाम पणे लिहू शकतो ! अमुक घटना किंवा दृश्य दाखवता येणार नाही ते टाळून वेगळ्या प्रकारे कसे दाखवता येईल यावर आपण विचार करू शकतो.
लेखकाने लिहिलेला व दिग्दर्शित केलेला "आयुष्य खरच खूप सुंदर आहे" ह्या चित्रपटाचा ट्रेलर
https://www.youtube.com/watch?v=pqvGG26cYY0
A film cannot be any good if it isn’t well written.
ERNEST LEHMAN
बर्याचदा आपणास कथा सापडते पण खुपदा संपूर्ण कथा गवसत नाही. एखादा विषय आपणास भावतो. उदा. लहान मुलांच्या शिक्षण संबधीच्या समस्या (तारे जमिन पर ), किंवा सरळ सरळ कथा मिळते लगान माफी मिळवण्या साठी क्रिकेट मैच (लगान) कथा नक्की झाली तर आपणास त्या संबधी संशोधन करावे लागते, आपल्या कथेचा काळ कोणता ? उदा. स्वातंत्र पूर्वीचा ? पेशवे कालीन ? इ. त्या लोकांची भाषा, बोलण्याची लकब, पेहराव इ. बाबतीत सखोल माहिती मिळवावी लागते. कथा सर्वथा काल्पनिक असेल तर ती भाषा कशी असेल ? वेशभूषा कशी असेल ? घरे फर्निचर शोभेच्या वस्तू, वाहने काय काय शोधावे लागेल हि यादी खूप वाढत जाणारी असते.
पण विषय निश्चिती अगोदर केली तर आपणास जरा जास्त संशोधन करावे लागते. त्या विषयाच्या अनुषंगाने काय काय लिखाण झाले आहे ? कोणत्या फिल्म बनल्या आहेत ? त्या विषयीच्या विविध लेखांचा अभ्यास ? त्या विषयातील तज्ञांच्या मुलाखती घेणे, त्या अनुसार कथेची अथवा प्रथम पात्राची (Hero) निर्मिती करावी लागते.
एकंदर विषयातून कथा किंवा सरळ कथा मिळाली म्हणजे काम पूर्ण झाले असे समजू नये कारण आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झालेली असते. स्क्रीन रायटर चे काम फक्त डायलॉग आणि त्यांच्या कृती (activity) लिहिणे नसते. स्क्रीन रायटर ला संपूर्ण एकसंध कथेचे वेगवेगळे तुकडे करावयाचे असतात. कोणकोणत्या ठिकाणी हि कथा घडते त्यानुसार ! कोणकोणत्या वेळेला हि कथा घडते त्या नुसार ! त्या ठिकाणांची (locations) सखोल माहिती निर्माण करावी लागते. उदा. बगंला आहे तर त्यात असणारे फर्निचर, जिना, तिथली श्रीमंती, ( असलेली किंवा नसलेली) तिथले कारपेट, दरवाजा, खिडक्या इ. सारे डीटेल्स निर्माण करावे लागतात. कोणत्या वेळेला आपले पात्र (character) जिन्यात असेल ? कधी खिडकीत असेल ? त्याच्यावर प्रकाश कसा किती असेल ? आजूबाजूला कोणते आवाज येत असतील ? कोणत्या ठिकाणी तो कसा बसेल ? कसा उठेल ? धावेल ? काय काय करेल ? आणि ते प्रेक्षकांना कसे दिसेल ? चित्रपट लेखकाला हे सारे सुसंगत रीतीने मांडावयाचे असते.
याचा सर्वचा अर्थ असा नाही कि स्क्रीन रायटरला उत्कृष्ट sound engineer, Cinematographer, set designer, किंवा Electrician असण आवश्यक आहे. स्क्रीन रायटरला डायरेक्टर पेक्षा जास्त नॉलेज असायला हवं की लीडिंग एक्टरच कौशल्य असायला हव ? तर असं नाहीये, पण स्क्रीन रायटरला हे सगळे कसे होईल ? जमेल कि नाही याचा अंदाज असायला हवा. आपण जे लिहितो आहोत ते पडद्यावर आणण्या साठी काय करावे लागेल ? ते कसे होईल हे समजलेले असले तर आपण ते ठाम पणे लिहू शकतो ! अमुक घटना किंवा दृश्य दाखवता येणार नाही ते टाळून वेगळ्या प्रकारे कसे दाखवता येईल यावर आपण विचार करू शकतो.
लेखकाने लिहिलेला व दिग्दर्शित केलेला "आयुष्य खरच खूप सुंदर आहे" ह्या चित्रपटाचा ट्रेलर
https://www.youtube.com/watch?v=pqvGG26cYY0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा