३) खलनायक (Villain)
नायकाला जे काही हवे असते त्यात येणारे अडथळे म्हणजे खलनायक ! ते नैसर्गिक असू शकतात, मानवी असू शकतात, आश्चर्य असे कि स्वत: नायकाने निर्मिलेले हि असू शकतात. (त्याने केलेल्या चुका). कधी कधी नायक स्वत: खलनायक असतो किंवा होतो. उदा, हिम्मत हरवून बसलेला नायक, मग त्याला उत्साहित करण्या साठी त्याचे मित्र किंवा नायिका गाणे गाते इ. काहीतरी करून त्याच्या आत एक जोश निर्माण केला जातो. पण सहसा आपण खूप चांगल्या रीतीने ओळखतो तो नायकाला पावलो पावली नडणारा खलनायक अमरीश पुरी !

खलनायक नायकाच्या विरोधात जे काही करतो ते जर नैतिकतेच्या किंवा कायद्याच्या दृष्टीने बरोबर असेल तर तो खलनायक जास्त प्रभावी ठरू शकतो.
खलनायकाची बाजूही आपणास जेव्हा योग्य वाटते उदा. आपला झालेले घोर अपमान त्याचा बदला घेन्या साठी तो खल प्रवृत्ती झाला आहे. बहुधा दोन भावांच्या कथेमध्ये असा प्रकार आढळतो. “आंखे “ मधला बँक रॉबरी करणारा मनेजर अमिताभ ! खूप बुद्धिमान खलनायक ही चित्रपटाला निश्चित उंची देतो.
आपल्या कथेच्या मर्यादा सांभाळून आपण असे काही करण्याचा प्रयत्न करावा.
एकंदर काय तर खलनायक प्रभावी असावा, म्हणजे त्याचा नायकाशी होणारा संघर्ष प्रभावी होतो मार्च २३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा