२) नायकाचे ध्येय (Want of Hero)
नायकाला (अर्थात ज्याची हि कथा आहे), काहीतरी हवे असते. त्याला हवे असलेले ते जितके मिळवावयास कठीण तितके ते मिळवण्याचे नाट्य प्रभावी होते. नायकाचे ध्येय जर खूप सर्व सामान्य असेल तर प्रेक्षकांना त्यात रोमांच ( Thrill ) जाणवणार नाही. त्याच प्रमाणे नायकाचे ध्येय जर अगदीच असाध्य (impossible )असेल तर ते प्रेक्षकांना पटणार नाही. हे खूप महत्वाचे सूत्र आहे . हा समतोल ज्या लेखकाला राखता आला तो जिंकलाच म्हणून समजा ! नायकांच ध्येय जितक आगळ वेगळ, कठीण असाध्य वाटणार पण साध्य होणार ------ हे शोधन आणि प्रभावी रीतीने दाखवण्या साठी लिहीण हा सर्वात महत्वाचा भाग चित्रपट लेखकाला जमला पाहिजे. लगान ह्या सिनेमात भुवन(आमिर खान) ह्या व्यक्तिरेखेला लगान पासून मुक्तता हवी असते. त्यासाठी तो दुप्पट लगान ची जोखीम पत्करतो. कहाणी मध्ये विद्या बागची (विद्या बालन) हिला तिच्या पतीची हत्या करणाऱ्या ला मारायचं असत. म्हणून ती गरोदर बनून फिरते व स्वत:चा जीव धोक्यात घालते. ह्यातून एक आणखी गोष्ट लक्षात घेण्य सारखी आहे ती अशी कि लेखकाला आपल्या नायकाला संकटात टाकावे लागते, आणि धक्का दायक रीतीने वाचवावे लागते. ह्या बद्दल आणखी सखोल विचार आपण पुढे करू.
मार्च २२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा