गुरुवार, ७ मार्च, २०१३

श्री गणेशा


कथा - पटकथा - संवाद 

आपण ह्या ब्लॉग वरून चित्रपट कथा पटकथा आणि संवाद लेखणाचे  तंत्र जाणून घेणार आहोत. 
अभ्यासू मित्रांनी याचा लाभ घ्यावा. 

श्री गणेशा ....................................... 7th March 2013

श्री गणेशा करतांना काही आत्म परीक्षणाची गरज आहे. चित्रपट क्षेत्राच जे आकर्षण आपणास आहे ते कितपत योग्य आहे ? आपल्या आंत आपल्या विचार प्रक्रियेत आपल्या  कल्पना शक्तीला हा भार पेलणार आहे का ? आपल्या मेन्दु मध्ये हे सॉफ्ट वेअर आहे का ?
   आपणास जन्म सोबत आई वडिलांच्या कडून शरीर सोबत काही मानसिक गुणसूत्र हि मिळालेली असतात. कदाचित असेल पण मागील जन्माचे संस्कार हि आपल्यावर येत असावेत ? ह्या सर्वातून आपल्या क्षमता तयार होतात. आपणास खरोखर चांगली कथा सुचते का ? आपल्याला सुचलेली कथा कुणाला आवडते का ? आपले मित्र परिजन कधी कधी आपणास मन राखण्यासाठी खोटच बोलतात, 
"अरे वा छान कथा आहे तुझी ! "
"तू ह्याच चित्रपट बनवच !" 
"तू उद्याचा स्टीवन स्पीलबर्ग च आहेस !" काय बोलतील याचा नेम नाहीच, पण त्याची अभिरुची कितपत प्रगल्भ आहे ? त्याचा अनुभव काय ? यावर त्याच्या वक्तव्याचा आपण विचार करावा. खूप वाचन कराव. खूप चित्रपट पाहावेत. आपल्या कथांनां कल्पनेच्या चित्रपट रुपात पाहून तारतम्याने विचार करावा. ह्या साठी आपल्याला आपला तिसरा डोळा वापरायचा असतो, अर्थात, प्रेक्षकांच्या नजरेतून बघता आले पाहिजे. 
 ह्याचे महत्वाचे कारण असे आहे की, ज्यांना चित्रपट बनवता येत नाही ते जर गप्प बसले तर खूप दर्जेदार चित्रपट तयार होतील. कमी बनतील पण चांगले बनतील. जे प्रेक्षकांना खूप  रंजक असे अनुभव देतील. आजकाल खुपदा प्रेक्षकांची फसवणूक होते, ते ज्या अपेक्षेने थिएटर मध्ये जातात आणि तोच तोच लेबल बदललेला मसाला पाहून हैराण होतात . आणि चित्रपट गृहात कधीही न जाण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय फार काळ टिकणारा नसेल पण तो चित्रपट व्यवसायाला निश्चितच घातक आहे. 
 तसेच आपली योग्यता नसतांना ह्या क्षेत्रात आलात तर तुम्हालाही तुमचे ध्येय गवसणार नाही. उलट कुणाच्या तरी मार्गात तुम्ही अडथळा ठरू शकाल. 
 तर आपल्या आंत ती क्षमता आहे अशी खात्री झाली कि मग हवी आहे ती प्रचंड अभ्यासाची जिज्ञासा. कथा हा सर्व उत्कृष्ट चित्रपटांचा आत्मा आहे. पाया आहे. ज्यावर एका उत्कृष्ट सिनेमाची बिल्डींग उभी करायची आहे ती जमीन म्हणजे कथा. त्यात नाविन्य असायला हवं. ती मनाला थेट भिडणारी असावी. सिनेमाच्या उंचीचा भार तोलणारी असावी. आणि ती बनवणारा लेखक तितक्याच क्षमतेचा असायला हवा. 
खूप वाचन हा एकमेव मार्ग आहे चांगला लेखक होण्याचा. 

"आयुष्य खरच खूप सुंदर आहे" ह्या चित्रपटाचा ट्रेलर लिंक https://www.youtube.com/watch?v=WPvWyKhYYL4



1 टिप्पणी:

  1. Sorry mala he patal nahi, konakad creativity cha tisra dola nasto. Yach changla udaharan mhnje ravindra nath tagor tyanni lekhna madhye ayush kadhla aani navarupala aale pan tyaana vayachya sarteveli kalal ki te uttam chitrakar suddha hou shakle aste. Aani creativity kashi asayla pahije ani koni padatalayla pahije tyat tari vyakti swatrant asayalach hav. Baki aasa pas challay te ghadu dya. Hich eka chotya lekhakachi apeksha. Dhanyawad....

    उत्तर द्याहटवा